मुंबईत फूटपाथवर झोपलेल्यांना टँकरनं चिरडलं, 2 महिलांचा जागीच मृत्यू

Vikhroli Accident : रस्त्यावर झोपलेल्या तीन जणांना टँकरनं चिरडल्याची घटना समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 9, 2019 07:12 AM IST

मुंबईत फूटपाथवर झोपलेल्यांना टँकरनं चिरडलं, 2 महिलांचा जागीच मृत्यू

मुंबई, 9 जून : रस्त्यावर झोपलेल्या तीन जणांना टँकरनं चिरडल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मुंबईतील विक्रोळी येथील ही दुर्घटना आहे.  कैलास कॉम्प्लेक्स टिम्बकटु हॉटेलजवळ पादचारी मार्गावर झोपलेल्या तीन जणांना टँकरने चिरडलं. हे तिघं जण साखर झोपेत असल्यानं आपल्यावर मृत्यू ओढावत आहे, हे त्यांना समजण्यापूर्वीच काळानं घाला घातला. टँकर चालकाच्या हलगर्जीपणामुळे या दोन महिलांचा नाहक बळी गेला आहे.

पाहा : SPECIAL REPORT : राष्ट्रवादीला 'वंचित' करून काँग्रेसला हवी नवी आघाडी?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री (8 जून) 9.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. टँकर पार्क करताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. याचवेळेस हा टँकर दुसऱ्या टँकरवर जाऊन आदळला. या घटनेत रस्त्यावर झोपलेली  हे तिघं जण टँकरखाली चिरडले गेले. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. जखमी मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

पाहा : SPECIAL REPORT : मुंबई विमानतळावर तुमच्या बॅगेतून सामनाची चोरी? हे आहे VIRAL VIDEO चं सत्य



पाहा :VIDEO : मराठवाड्यातील दुष्काळाबाबत मुख्यमंत्र्यांची ग्वाही, म्हणाले...

दरम्यान, अपघातानंतर टँकर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

VIDEO : अंडी आणि टोमॅटोचा झाला बर्फ, फोडण्यासाठी जवानांना वापरावा लागतोय हातोडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 9, 2019 07:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...