मुंबई, 28 सप्टेंबर : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना ईडी (ED)ने पुन्हा एक समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. अनिल परब यांना हे ईडीकडून दुसरे समन्स आले आहे. ईडीकडून आलेल्या या समन्सनंतर आज अनिल परब ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल (Anil Parab reaches ed office) झाले आहेत. चौकशीला सामोरं जाण्यापूर्वी अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले अनिल परब?
"मला आज ईडीचं दुसरं समन्स मिळालेलं आहे आमि मी चौकशीला आज जात आहे. मी शिवसेनाप्रमुखांची आणि माझ्या मुलीची शपथ घेऊन मागे सांगितलं आहे की मी कुठलंही चुकीचं काम केलंलं नाहीये. त्यामुळे आज मी चौकशीसाठी सामोरं जात आहे. चौकशीत जे प्रश्न मला विचारले जातील त्याची उत्तरं दिली जातील आणि चौकशीत पूर्णपणे सहकार्य करणार. चौकशीला नेमकं का बोलवलं आहे याचं कारण अद्याप मला माहिती नाही. चौकशीला सामोरं गेल्यावर अधिकृतपणे कळेल. माझ्याकडून कोणतीही चूक झालेली नाहीये."
अनिल परब यांना यापूर्वी सुद्धा ईडीने समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी ईडीने अनिल परब यांना चौकशीसाठी हजर राण्यास सांगितले होते. मात्र, अनिल परब हे त्यावेळी ईडी कार्यालयात उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर आता ईडीने पुन्हा एकदा त्यांना समन्स बजावत चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते.
मिळालेल्या माहितीनुसार मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी करण्यासाठी ईडीने हा समन्स बजावला आहे. सचिन वाझे गृहविभागातील बदल्यांच्या संदर्भात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला होता. तसेच सचिन वाझे याने दिलेल्या आपल्या कथित स्टेटमेंटमध्ये अनिल परब यांच्यावर आरोप करत म्हटलं होतं की, बदल्या थांबवण्यासाठी अनिल परब यांना 20 कोटी रुपये मिळाले होते.
संजीव पलांडेवर आरोप
सचिन वाझे याने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही आरोप केला होता. तसेच अनिल देशमुख यांचा स्वीय सहाय्यक संजीव पलांडे याच्यामार्फत पैशांची देवाणघेवमा करण्यात आल्याचं म्हटलं होतं.
वाझेचा गंभीर आरोप
सचिन वाझे याने आरोप करत म्हटले होते की, पोलीस दलातील डीसीपींच्या मार्फत 40 कोटी रुपये जमा करण्यात आलेले. त्यापैकी 20 कोटी रुपये हे अनिल परब आणि अनिल देशमुख यांना देण्यात आले. अनिल देशमुख यांना पैसे हे त्यांच्या स्वीय्य सहाय्यकाच्या मार्फत देण्यात आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil parab, ED