मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 365 कोटी 67 लाख रुपये मंजूर

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 365 कोटी 67 लाख रुपये मंजूर

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा, नुकसान भरपाईसाठी 365 कोटी मंजूर

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा, नुकसान भरपाईसाठी 365 कोटी मंजूर

365 crore sanction for crop damage in Maharashtra: अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

मुंबई, 7 ऑक्टोबर : राज्यात जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy rainfall) राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली. यात शेतपिकांच्या नुकसानाकरिता (Crop damage farmers will get aid from Maharashtra Government) बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता एकूण 365 कोटी 67 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या मदतीमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा (big relief for farmers) मिळणार आहे. तरी सर्व कार्यान्वयन यंत्रणांनी तात्काळ मदत बाधीतांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घेण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी दिले आहेत.

अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्यासाठी पुणे विभागासाठी 150 कोटी 12 लाख रुपये, कोकण विभागासाठी 8 कोटी 51 लाख रुपये, अमरावती विभागासाठी 118 कोटी 41 लाख रुपये, नाशिक विभागासाठी 1 लाख रुपये, औरंगाबाद विभागासाठी 77 कोटी 97 लाख रुपये, नागपूर विभागासाठी 10 कोटी 65 लाख रुपये याप्रमाणे एकूण 365 कोटी 67 लाख इतका निधी मंजूर झाला आहे.

'मिशन कवच कुंडल'ची आरोग्यमंत्र्यांकडून घोषणा, जाणून घ्या काय आहे ही योजना

अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तसेच मंत्रीमंडळातील सर्व सदस्यांनी पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष जावून पाहणी करून तेथील शेतकऱ्याशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. या अनुषंगाने महसूल व वन विभागाने निधी मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित केला असून पूरपरिस्थितीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानाकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून एकूण 365 कोटी 67 लाख इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली असून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तातडीने विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.

असे होणार अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचे वाटप

कोकण विभागासाठी 8 कोटी 51 लाख रुपये, नाशिक विभागासाठी 1 लाख रुपये, पुणे विभागासाठी 150 कोटी 12 लाख रुपये, अमरावती विभागासाठी 118 कोटी 41 लाख रुपये, औरंगाबाद विभागासाठी 77 कोटी 97 लाख, नागपूर विभागासाठी 10 कोटी 65 लाख रुपये याप्रमाणे एकूण 365 कोटी 67 लाख इतका निधी मंजूर झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 436 जणांचा बळी तर 17 लाख हेक्टर शेतीचं नुकसान

मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत सप्टेंबर महिन्यात 71 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर राज्यात या वर्षी अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत काही ठिकाणी 4 तर काही टिकाणी 8 वेळा अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. तर केवळ वीज कोसळून 196 जणांचा मृत्यू झाला आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे 2 दिवसात पावसाने अनेक भागात नद्या ओसंडून वाहत आहेत. शेतीचं नुकसान झालं आहे. अनेकांना जीव गमवावा लागला, जनावर वाहून गेली आहेत. काही ठिकाणी 100 ते 150 मिली पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील 10 पैकी 7 जिल्ह्यात सरासरी 170 ते 190 मिली पाऊस झाला आहे. उस्मानाबादमध्ये हेलिकॉप्टर आणि बोटीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. आतापर्यंत 81 % पंचनामे झाले असून 19% पंचनामे उर्वरित आहेत. 17 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे पंचनाम्यात अडथळे येत आहेत. पंचनामे झाल्यानंतर 22 लाख हेक्टर जमिनीच नुकसान होण्याची अंदाज आहे.

First published:

Tags: Farmer, Rain, महाराष्ट्र