राजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा

राजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा

राजस्थानात विविध 33 मागण्यांसाठी सरकारी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. यात पगार वाढ आणि स्वतंत्र केडर या मागण्यांचा समावेश आहे

  • Share this:

मुंबई,13 नोव्हेंबर: राजस्थानमध्ये सरकारी डॉक्टरांनी पुकारलेल्या आंदोलनाला मागमो म्हणजेच महाराष्ट्र असोसिएशन ऑफ गव्हरन्मेन्ट ग्रेड ए डॉक्टर्स असोशिएशने पाठिंबा दिला आहे. राजस्थानातील 8000 सरकारी डॉक्टर अनियमित काळासाठी संपावर गेले आहेत.

राजस्थानात  विविध 33 मागण्यांसाठी सरकारी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. यात पगार वाढ आणि स्वतंत्र केडर या मागण्यांचा समावेश आहे. 8000 डॉक्टर संपावर गेल्यामुळे राजस्थानमध्ये सरकारने लष्कर आणि रेल्वेच्या डॉक्टरांना दवाखान्यांनमध्ये आणि रूग्णालयांमध्ये पाचारण केलं आहे.राजस्थान सरकार चर्चा करून डॉक्टरांचे प्रश्न सोडवू शकते पण तसं अजून तरी राजस्थान सरकार करत नाही आहे. त्यामुळे डॉक्टरांचा प्रश्न अधिकच चिघळला आहे. राजस्थानातील डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी 14 नोव्हेंबरला देशभरातले डॉक्टर धरणे आंदोलन करणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र असोसिएशन ऑफ गव्हरन्मेन्ट ग्रेड ए डॉक्टर्स असोशिएशन सहभागी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2017 09:05 AM IST

ताज्या बातम्या