Maharashtra budget LIVE : पेट्रोल-डिझेलच्या दरात सूट नाही, अजितदादांकडून काँग्रेसच्या मागणीला नकार

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. कोरोनाशी मुकाबला करत असता अर्थमंत्री अजित पवार यांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागली आहे त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

 • News18 Lokmat
 • | March 08, 2021, 15:17 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  15:46 (IST)

  अजित पवारांनी शेतकरी आणि महिलांसाठी काय केली घोषणा? संपूर्ण भाषण वाचा एकाच पेजवर

  15:37 (IST)

  राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प - मुख्यमंत्री
  'कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थिती होती'
  रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा -मुख्यमंत्री

  15:32 (IST)

  'मविआ'च्या अर्थसंकल्पावर विरोधकांचा घणाघात
  शेतकऱ्यांना कुठलीही मदत नाही - फडणवीस
  अर्थसंकल्पातून सामान्यांची निराशा - फडणवीस
  ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प फसवा - फडणवीस
  बिनव्याजी कर्ज योजना फसवी - देवेंद्र फडणवीस
  वीजबिलाबाबत कुठलीही घोषणा नाही - फडणवीस
  महिलांसाठी प्रभावी योजना नाही - देवेंद्र फडणवीस
  'पेट्रोल, डिझेलवर बोलण्याचा अधिकार नाही'
  'राज्य सरकारचं की मुंबई मनपाचं बजेट होतं?'
  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा सवाल 

  15:31 (IST)

  कोविडमुळे उद्योग व्यवसायाला मोठा फटका
  फक्त महिलांसाठी मुद्रांक शुल्कात 1 टक्का सवलत
  सवलतीमुळे 1 हजार कोटीची तूट अपेक्षित 

  15:26 (IST)

  सध्या अस्तित्वात असलेल्या मुल्यवर्धीत करात कायद्याच्या अनुसुची ख नुसार, 60 टक्क्यांवरून 65 टक्के करण्यात येणार आहे. सध्या मुल्यवर्धीत कराचा दर 35 टक्क्यांवरून 40 टक्के करण्यात आला आहे.

  15:18 (IST)

  डिझेल आणि पेट्रोलच्या दरात राज्य सरकारकडून कोणतीही सवलत देण्यास नकार, इंधन दरवाढीत कोणतीही सवलत देण्याबद्दल अजित पवारांचा नकार

  15:16 (IST)

  मद्य आणि देशी मद्याच्या दरात प्रतिलिटर दरात वाढ
  सध्या मुल्यवर्धीत करात 60 टक्क्यांवरून 64 टक्के करण्यात आला आहे.

  15:16 (IST)

  महिलेच्या नावाने घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात १ टक्का सवलत दिली जाणार, त्यामुळे १००० कोटी महसुली तूट येण्याची शक्यता आहे

  15:14 (IST)

  राज्यात १००० कोटी रुपयांची महसुली तूट

  15:13 (IST)


  महिलेच्या नावाने घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात १ टक्का सवलत दिली जाणार

  महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प (State Budget 2021) आज सादर केला जाणार आहे. कोरोनाशी मुकाबला करत असता अर्थमंत्री अजित पवार यांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागली आहे त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.