SPECIAL REPORT : असं झालं प्रदीप शर्मांचं ठाकुरांच्या गडात 'राजकीय एन्काऊंटर'!

SPECIAL REPORT : असं झालं प्रदीप शर्मांचं ठाकुरांच्या गडात 'राजकीय एन्काऊंटर'!

शिवसेनेनं या मतदारसंघात मोठा जोर लावला होता. मात्र, मतदारांनी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांनाच भरघोस मतदान केलं.

  • Share this:

वसई, 28 ऑक्टोबर : वसई विरार मधला गड राखण्यात बहुजन विकास आघाडी यशस्वी झाली आहे. गावागावात जाऊन दिलेल्या वचनांची पुर्तता करणार असल्याचे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं.

वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. बहुजन विकास आघाडीनं तिन्ही जागा जिंकून त्यांची ताकद दाखवून दिलीय. शिवसेनेनं या मतदारसंघात मोठा जोर लावला होता. मात्र, मतदारांनी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांनाच भरघोस मतदान केलं.

बोईसर मतदार संघातले उमेदवार राजेश पाटील यांच्या विजयात किंगमेकरची भूमिका बजावली ती बविआचे कार्याध्यक्ष राजीव पाटील यांनी. बोईसर मतदार संघातील रोजगार, इन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षणातील समस्या दूर करण्याचं व्हिजन असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

मतदारसंघातल्या विकास कामांना नागरिकांनी साथ दिली. निवडणुकीत फक्त गुंडगिरीचा मुद्दा मांडला गेला. मात्र, विकासाबद्दल अवाक्षरही काढण्यात आलं नाही. त्यामुळे नागरिकांनी बविआला साथ दिल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय.

पालघर जिल्ह्यात तीन जागा जिंकून बहुजन विकास आघाडीनं शिवसेनेला मात देऊन वर्चस्व सिद्ध केलंय.

----------------------------

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2019 07:46 PM IST

ताज्या बातम्या