SPECIAL REPORT : 'आम्ही मतदान करतो, आम्हाला माणूस म्हणून तरी जगू द्या!'

SPECIAL REPORT : 'आम्ही मतदान करतो, आम्हाला माणूस म्हणून तरी जगू द्या!'

21 तारखेला मतदानासाठी सज्ज झालाय महाराष्ट्रवासी. स्त्री-पुरुष सगळेच अगदी तृतीयपंथी मतदारसुद्धा. कारण प्रत्येक निवडणूक काही चांगले बदल आणेल ही अपेक्षा आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑक्टोबर : येत्या 19 तारखेला विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होतं आहे. प्रत्येक मतदार मतदानासाठी सज्ज झाला. आणि आता मतदान करण्यासाठी तृतीयपंथी मतदारही पुढे येत आहेत. सोनिया सुर्वे या तृतीयपंथी मतदार यावेळी मतदान करणार आहेत. महाराष्ट्रातल्या एकूण मतदारांपैकी 2 हजार 636 इतके तृतीयपंथी मतदार आहेत.

21 तारखेला मतदानासाठी सज्ज झालाय महाराष्ट्रवासी. स्त्री-पुरुष सगळेच अगदी तृतीयपंथी मतदारसुद्धा. कारण प्रत्येक निवडणूक काही चांगले बदल आणेल ही अपेक्षा आहे. पण हीच अपेक्षा तृतीयपंथी करू शकतील का? त्यांना त्यांचा काम करण्याचा मूलभूत अधिकार तरी हा समाज देईल का?

सोनिया सुर्वे, देवाची जितकी ही भक्त. तितकीच लोकशाहीची सुद्धा. पालिका निवडणूक असो किंवा मग लोकसभा. जिथे ही असेल तिथून मतदानासाठी कळव्यात पोहोचते. पण बघा आपलं कर्तव्य बजावणारी सोनिया जेव्हा आपला काम करण्याचा अधिकार मागते तेव्हा काय होतं?

सोनिया ने मॅक या vfx च्या नामांकित संस्थेतून ग्राफिक्स चा डिप्लोमा केला आहे. गेल्या 8 वर्षांपासून सोनिया काम मिळावं म्हणून उंबरठे झिजवते. पण तिला काम तर दूरची गोष्ट पण साधं माणूस म्हणूनही वागवलं गेलं नाही. कुणी तोंडावरच काम देणार नाही असं सांगितलं, तर कुणी थेट तोंडचं वाकड केलं.

महाराष्ट्रात 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 इतके मतदार आहेत. पैकी 2 हजार 636 इतके तृतीयपंथी मतदार आहेत. नोंदणी झालेल्या तृतीयपंथी मतदारांचा आकडा हा कमी दिसत असला तरी नोंदणी पासून वंचित असलेल्या तृतीयपंथीचा आकडा फार मोठा आहे.

========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2019 08:42 PM IST

ताज्या बातम्या