SPECIAL REPORT : 'अभिमानी' सेनेचा 'अभिमन्यू' झालाय का?

मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत निम्मा वाटा मागणाऱ्या सेनेच्या आक्रमकतेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या उलटसुलट वक्तव्यांमुळे गेले 14 दिवस हवा मिळाली.

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2019 09:00 PM IST

SPECIAL REPORT : 'अभिमानी' सेनेचा 'अभिमन्यू' झालाय का?

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 07 नोव्हेंबर : सत्तेच्या या संघर्षात शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसतं आहे. शिवसेना कितीही आक्रमक भाषा करत असली तरी भाजपनं आपली भूमिका कायम ठेवली. त्यामुळे सेना आता काय करणार हा प्रश्न आहे.

मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत निम्मा वाटा मागणाऱ्या सेनेच्या आक्रमकतेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या उलटसुलट वक्तव्यांमुळे गेले 14 दिवस हवा मिळाली. पवारांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी एकीकडे सेनेला गाजर दाखवत भाजपची धाकधूक वाढवण्याचा प्रयत्न केला.

सत्तानाट्यात विरोधी पक्षांच्या एन्ट्रीमुळे सेनेच्या संजय राऊतांची तोफ धडधडत राहिली. पण, सेनेच्या या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचीच भूमिका भाजपनं घेतली. सेनेसाठी 24 तास चर्चेची दारं उघडी आहेत, असं सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणेच गेले 14 दिवस सेनेला झुलवत ठेवलं.

भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या या चक्रव्युहात अभिमानी सेनेचा अभिमन्यू झालाय. स्वत: सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या विरोधात असल्याचं कळतंय. शरद पवारांनीही विरोधात बसणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Loading...

सेनेच्या आक्रमकपणामुळे सुरुवातीला बॅकफूटवर असलेली भाजप पवारांच्या शाब्दिक खेळामुळे आता निवांत झाली. इतकंच काय वाघाला तसं हाताळायचं याचं कौशल्य माहीत असल्याचंही भाजप नेते सांगत आहे.

अखेर शिवसेनेचे मंत्री बुधवारी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भाजपच्या मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसले. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट असल्यानं आता बॉल शिवसेनेच्या कोर्टात आहे.

सत्तेच्या कुरुक्षेत्रातला हा चक्रव्यूह शिवसेना कसा भेदते, हे पाहायचं आहे.

================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2019 09:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...