SPECIAL REPORT : भाजपशी 'सामना' करणाऱ्या संजय राऊतांबद्दल तुम्हाला 'हे' माहिती आहे का?

SPECIAL REPORT : भाजपशी 'सामना' करणाऱ्या संजय राऊतांबद्दल तुम्हाला 'हे' माहिती आहे का?

2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर मुंबईतल्या रस्त्यांवर शिवसैनिक आणि राणे समर्थक भिडले.

  • Share this:

संतोष गोरे, प्रतिनिधी

मुंबई, 02 नोव्हेंबर : राज्यातला खासदार असलेल्या एका संपादकानं सध्या चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर आणखी एक खासदार असलेल्या एका माजी संपादकानं अलिप्त भूमिका घेतली.

राज्यात सत्तास्थापनेचा संघर्ष तीव्र झाला. मुख्यमंत्रिपदाच्या समसमान वाटणीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये घमासान युद्ध सुरू झालं आहे. शिवसेनेकडून या लढाईचं नेतृत्व सरदार संजय राऊतांकडे देण्यात आलंय. शिवसेनेकडून ही लढाई एकहातीपणे संजय राऊतांकडे दिल्याचं स्पष्ट होतं आहे. लेखणीचे रोखठोक सपासप वार करणाऱ्या संजय राऊतांनी त्यांच्या सच्चाईच्या बाईटनं भाजपच्या नेतृत्वाला जेरीस आणलं आहे.

'सामना'चे 30 वर्षांपासून संपादक असलेले संजय राऊत शिवसेनेचे नेतेही आहेत. संजय राऊतांच्या लिखाणाचे राज्यात लाखो चाहते आहेत. ज्वलंत लिखाण हे त्यांचं खास वैशिष्ट्य. संजय राऊतांमुळे कधी कधी शिवसेना अडचणीतही येते. मात्र, अनेकदा अडचणीच्या काळात संजय राऊत शिवसेनेचा किल्ला लढवतात.

2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर मुंबईतल्या रस्त्यांवर शिवसैनिक आणि राणे समर्थक भिडले. शिवसेना अनेकदा बॅकफूटवर दिसली. त्यावेळी संजय राऊतांनी सामनातल्या बातम्या आणि अग्रलेखांनी राणेंना जेरीस आणलं. कुठेच सत्तेत नसलेल्या शिवसैनिकांच्या मनात अंगार पेटवला. आता सत्तेच्या संग्रामातही शिवसेनेची भूमिका संजय राऊत आक्रमकपणे मांडताना दिसताहेत.

उद्धव ठाकरेंच्या आदेशाशिवाय संजय राऊत इतकी आक्रमक भूमिका घेणार नाहीत, हे ही तितकंच खरं आहे. संजय राऊतांच्या आडून उद्धव ठाकरेच सत्तेचा सारीपाट मांडत आहेत. त्यामुळे संजय राऊतांना उद्धव ठाकरेंनीच फ्री हँड दिल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.

शिवसेनेचा संपादक असलेला खासदार राजकीय लढाईत शत्रूंवर तुटून पडलाय. तर दुसरीकडे काँग्रेसच्या छावणीत असलेले माजी संपादक आणि खासदार असलेले कुमार केतकर ऐन लढाईत युद्धभूमीच्या आसपासही दिसत नाहीत.

खासदार होण्याआधी शिवसेना भाजपवर लेखणीचे सपासप वार करणारे, विविध वाहिन्यांवरील टॉक शो मध्ये महायुतीला झोडपून काढणारे कुमार केतकर आता साधा 15 सेकंदाचा बाईटही देताना दिसत नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही न दिसलेले केतकर आताही कुठेच दिसत नसल्यानं काँग्रेसच्या गोटात चर्चेला ऊत आला आहे.

समाजात जागृती आणनं, अन्यायाला वाचा फोडणं हे संपादकांचं काम. मात्र, आता बदलत्या परिस्थितीत राजकीय पक्षांचं मुखपत्र असलेल्या दैनिकांमधल्या संपादकांना जनजागृतीपेक्षा सत्ताजागृती महत्त्वाची झाली आहे आणि त्यामुळेच अग्रलेख लिहणारे संजय राऊत अग्रक्रमाने सत्तेच्या कुरूक्षेत्रात राजकीय महाभारत घडवत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचा किल्ला लढवण्याची जबाबदारी असलेल्या कुमार केतकरांनी तलवार का म्यान केली, हे मात्र कळायला मार्ग नाही.

=================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 10:59 PM IST

ताज्या बातम्या