मुंबई, 14 नोव्हेंबर :
आज संध्याकाळी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ तर काँग्रेसचे नेते विजय वट्टेटीवार, अशोक चव्हाण यांच्यामध्ये समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत महाशिवआघाडीमध्ये अंतिम मसुद्दा तयार झाला आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी अंतिम स्वरूप दिले आहे, अशी माहिती वट्टेटीवार यांनी दिली. सेनेला बाहेर किंवा सत्तेत सहभागी होणार आहे की नाही, याबद्दल अजून काही निर्णय झाला नाही, अशी माहितीही वट्टेटीवार यांनी दिली.
दरम्यान, राज्यात सत्तास्थापनेच्या वाटाघाटी सुरू असताना आता सत्तास्थानपेच्या तिढ्यावर राजधानीतही खलबतं होणार आहेत. 17 नोव्हेंबर महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीबाबत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट होणार आहे. त्यावेळी किमान कार्यक्रमाच्या मसुद्यावर निर्णय होणार असं कळतं आहे, अशी माहिती सूत्रांनी न्यूज१८ लोकमतला दिली.
======================================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा