SPECIAL REPORT : निवडणुकीनंतर सेनेचा बदलला 'सूर', भाजप 'हा' निर्णय घेईल का?

SPECIAL REPORT : निवडणुकीनंतर सेनेचा बदलला 'सूर', भाजप 'हा' निर्णय घेईल का?

एकीकडं राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजप-सेनेच्या हालचाली सुरू आहेत. तर दुसरीकडे युतीत युतीत सत्तासंघर्ष सुरू झालाय.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी

मुंबई, 29 ऑक्टोबर : एकीकडं राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजप-सेनेच्या हालचाली सुरू आहेत. तर दुसरीकडे युतीत युतीत सत्तासंघर्ष सुरू झालाय.

लोकसभा निवडणुकीनंतर एकमेकांचे गोडवे गाणारे भाजप- शिवसेना युतीतीचे नेते आता एकमेकांविरोधात बोलू लागले आहे. त्याचं कारण म्हणजे, भाजपला एकहाती सत्ता गाठता न आल्यामुळं शिवसेनेचं वजन वाढलं आहे. खरंतर राज्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसामुळं पिकांचं आतोनात नुकसान झालंय.

हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यामुळं बळीराजा हताश झाला आहे. मात्र, युतीचे नेते सत्तेचं गणित जुळवण्यात मश्गुल आहेत.सत्तेच्या सारीपाटावर आता शह-काटशहाचं राजकारण सुरू झालंय.

आता युतीमध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला असून विशेषत: विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचा सूर बदलला. सत्ता समिकरण जुळवताना एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न युतीच्या नेत्यांकडून केला जात आहे.

अशातचं सेनेचे खासदार संजय राऊतांकडून शरद पवारांची भलामण केली जात आहे. त्यामुळं राऊतांची ही भूमिका सेनेची अधिकृत भूमिका आहे का? असाही प्रश्न निर्माण झाला. सत्तेचं सोपान गाठण्यासाठी शिवसेना भाजपशी काडीमोड घेणार का? आणि तसं झाल्यासं राष्ट्रवादीशी जुळवून घेताना सेनेचा राम मंदिराचा प्रश्न कसा सुटणार? असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झाले आहे.

भाजप-सेनेत सत्तासंघर्ष सुरू असताना शिवसेनेत लोकनियुक्त आणि मागच्या दारानं आलेल्या आमदार - खासदारांमध्येही रस्सीखेच सुरू झालीय.

या सगळ्या राजकीय घडमोडींच्या पार्श्वभूमीवर युतीतील हा सत्तासंघर्ष कोणत्या दिशेला जाणार च खरा प्रश्न आहे.

========================

First published: October 29, 2019, 7:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading