SPECIAL REPORT : महाशिवआघाडीत 'या' मुद्यावरून अडलं घोडं?

SPECIAL REPORT : महाशिवआघाडीत 'या' मुद्यावरून अडलं घोडं?

राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षामुळं राजकीय वातावरण अक्षरश: ढवळून निघालंय. मुख्यमंत्रिपदावरुन भाजप-सेनेत बिनसल्यानंतर राज्यात अभुतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 नोव्हेंबर : सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ सुरू झालं आहे. मात्र, सत्ता वाटपात मुख्यमंत्रिपदासह महत्त्वाची खाती कळीचा मुद्दा ठरणार आहेत.

राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षामुळं राजकीय वातावरण अक्षरश: ढवळून निघालंय. मुख्यमंत्रिपदावरुन भाजप-सेनेत बिनसल्यानंतर राज्यात अभुतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

तर दुसरीकडं भाजपपासून फारकत घेतलेल्या शिवसेनेनं काँग्रेस-राषट्रवादीच्या मदतीनं सत्तास्थापनेसाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. सत्तेचं सोपान गाठण्यासाठी विरोधी विचारधारेच्या पक्षांनी एकत्र येण्याच्या दिशेनं आता वाटचाल सुरू केली आहे.

मंगळवारी काँग्रेस नेते अहमद पटेल आणि मल्लिकार्जून खरगे यांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली.त्यानंतर बैठकांचा सीलसीला सुरु झालाय.बुधवारी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

शिवसेनेची सगळी मदार आता दोन्ही काँग्रेसवर आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सत्तास्थापनेविषयी चर्चा झाल्यानंतरचं शिवसेनेशी बोलणी केली जाणार आहे.

खरंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये प्रत्यक्षात चर्चेला सुरुवात झाल्यानंतरचं सत्ता स्थपानेच्या दिशेनं वाटचाल सुरू होणार आहे. त्यामध्ये मुख्यमंत्रिपद आणि गृह, अर्थ, महसूल आणि नगरविकास ही महत्त्वाची खाती कळीचा मुद्दा ठरणार आहे.

या सगळ्या राजकीय घडामोडींच्या प्रार्श्वभूमीवर राज्यात आणखी काही दिवस हे चर्चेचं गुऱ्हाळ चालण्याची शक्यता आहे.

==============

Published by: sachin Salve
First published: November 13, 2019, 10:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading