Elec-widget

महाशिवआघाडीचा बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी फैसला, सेनेचा मुख्यमंत्री घेणार शपथ?

महाशिवआघाडीचा बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी फैसला, सेनेचा मुख्यमंत्री घेणार शपथ?

राज्यात सत्तास्थापनेच्या वाटाघाटी सुरू असताना आता सत्तास्थानपेच्या तिढ्यावर राजधानीतही खलबतं होणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 14 नोव्हेंबर : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना आणि महाआघाडीमध्ये जोर बैठका सुरू आहे. समन्वय समितीच्या बैठकीत अंतिम मसुदा पूर्ण होणार असल्याचं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं आहे. परंतु, सेनेनं आपला मुख्यमंत्री हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी शपथ घेणार असं सेनेनं घोषणा केली होती. आता हा 17 तारखेला शपथविधी होणार काय याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलं आहे.

राज्यात सत्तास्थापनेच्या वाटाघाटी सुरू असताना आता सत्तास्थानपेच्या तिढ्यावर राजधानीतही खलबतं होणार आहेत. 17 नोव्हेंबर रोजी म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीबाबत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट होणार आहे. त्यावेळी किमान कार्यक्रमाच्या मसुद्यावर निर्णय होणार असं कळतं आहे, अशी माहिती सूत्रांनी न्यूज१८ लोकमतला दिली.

एकीकडे शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदासाठी भाजपपासून दूर राहणे पसंत केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेनेच्या नेत्यांनी बैठकी पार पडल्या आहे. आता शरद पवार आणि सोनिया गांधींची दिल्लीत बैठक होत आहे. त्यामुळे नेमकं 17 तारखेला सेनेच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी होणार की नाही यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

महाशिवआघाडीच्या मुसद्याला अंतिम स्वरूप

दरम्यान, याआधी आज गुरुवारी मुंबईत शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची समन्वय समितीची बैठक पार पडली.या बैठकीमध्ये जवळपास सर्वच मुद्यांवर चर्चा पूर्ण झाली आहे. यावर तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. या बैठकीतला मसुद्दा तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरात लवकर सरकार स्थापन होईल, असे संकेत काँग्रेसचे नेते विजय वट्टेटीवार यांनी दिली आहे.

Loading...

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ तर काँग्रेसचे नेते विजय वट्टेटीवार, अशोक चव्हाण यांच्यामध्ये समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत महाशिवआघाडीमध्ये अंतिम मसुद्दा तयार झाला आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी अंतिम स्वरूप दिले आहे, अशी माहिती वट्टेटीवार यांनी दिली. सेनेला बाहेर किंवा सत्तेत सहभागी होणार आहे की नाही, याबद्दल अजून काही निर्णय झाला नाही. परंतु, राज्यात परतीच्या पावसामुळे शेतक्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे, यासाठी सरकार लवकरात लवकर स्थापन झाले पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मसुद्यावर अंतिम निर्णय हायकमांड घेणार आहे, त्यानंतर लवकरात लवकर सरकार स्थापन होईल, अशी माहितीही वट्टेटीवार यांनी दिली.

शिवसेनेनं आपली कट्टर हिंदुत्वाची भूमिका सौम्य करावी अशी मागणी काँग्रेस यावेळी करु शकतं अशी माहिती आहे. आघाडीमध्ये चर्चा सुरळीत पार पडावी यासाठी केंद्रीय आणि राज्य समिती स्थापन करण्यात आली आहे.

एनडीएच्या बैठकीला सेना गैरहजर राहणार!

दिल्ली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला शिवसेना गैरहजर राहणार असल्याचं कळत आहे. येत्या 17 नोव्हेंबर रोजी दिल्लीत बैठक होत आहे. 19 तारखेपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर 17 तारखेला एनडीएची बैठक बोलावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता एनडीच्या बैठकीला न जाण्याचा निर्णय सेनेनं घेतला आहे.

======================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2019 08:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com