Elec-widget

संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल, केला 'हा' गंभीर आरोप

संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल, केला 'हा' गंभीर आरोप

2014 साठी सुद्धा असाच एनडीएतून बाहेर पडण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. राज्यात भाजपने सेनेसोबत युती तोडली होती. परंतु, एनडीएवर कुणाचा मालकी हक्क नाही.

  • Share this:

मुंबई, 16 नोव्हेंबर : एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीला जाण्याचं नाकारून सेनेनं आता एनडीएतून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एनडीएच्या बैठकीवरून भाजपवर एकच हल्लाबोल केला आहे. तसंच भाजप जर सर्वात मोठा आहे तर मग राज्यपालांनी बोलावलं होतं. तेव्हा सरकार स्थापन का केलं नाही?, भाजपला राष्ट्रपती राजवटीच्या आड घोडेबाजार करायचा आहे, असा आरोपही राऊत यांनी केला आहे.

संसदीय हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएने आपल्या घटकपक्षांची बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीला सेनेनं जाण्यास नकार दिला आहे. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी सेनेची भूमिका स्पष्ट केली.

एनडीएची बैठक ही काही पक्षप्रमुखांची नव्हती. संसदेचं अधिवेशन सुरू होण्याआधी 48 तासांआधी एनडीएच्या घटकपक्षांची बैठक होत असते. सध्या राज्यात राजकीय परिस्थितीत पाहात बरीच धावपळ सुरू आहे. त्याआधीही अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर एनडीएच्या या बैठकीबद्दल शिवसेनेला निमंत्रण मिळालं नाही. पण, पत्र मिळालं नसलं तरी हरकत नाही. याआधीच आमचा बैठकीला न जाण्याचा निर्णय झाला होता, असा खुलासा राऊत यांनी केला.

Loading...

मोदी-शहांवर निशाणा

2014 साठी सुद्धा असाच एनडीएतून बाहेर पडण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. राज्यात भाजपने सेनेसोबत युती तोडली होती. परंतु, एनडीएवर कुणाचा मालकी हक्क नाही. कुणाची ही जहागीर नाही. शिवसेना, अकाली दल एनडीएचे घटक संस्थापक आहे. कुणाच्या मनात असेल आम्ही कुणाला पत्र दिलं नाही, अशा भ्रमात आहे ते चूक करत आहे. जेव्हा एनडीए स्थापन झाली, तेव्हा आताचे हे नेते नव्हते. एनडीएमध्ये मालकशाही चालणार नाही, असं म्हणत राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं नाव न घेता निशाणा साधला.

तसंच, महाराष्ट्राच्या अस्मिता आणि न्यायहक्कासाठी सध्या आम्ही एनडीएपासून दूर आहोत. उद्धव ठाकरे यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न झाला म्हणून आम्ही बाहेर आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

'भाजपला राष्ट्रपती राजवटीचा फायदा घ्यायचा'

105 त्यांच्याकडे आकडा आहे. गृहित धरून चालूया 119 असेलही. जर भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. जेव्हा राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलं होतं. तेव्हा भजापने असमर्थता दर्शवली. त्यानंतर जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू झाली त्यानंतर भाजप नेत्यांचे सूर बदलले. राष्ट्रपती राजवटीचा फायदा घेऊन घोडेबाजार करून सरकार स्थापन करण्याचा भाजप नेत्यांचा हेतू आहे. मग आधीच का दावा केला नाही. राजभवनातून भाजपला वेगळे 40-50 आमदार दिले आहे का? असा थेट सवाल राऊत यांनी भाजपला केला.

लवकरच गोड बातमी!

महाशिवआघाडीमध्ये समसमान कार्यक्रमाचा मसुदा तयार झाला आहे. यात पदांच्या वाटपावर कोणतीही चर्चा झाली नाही. मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार आहे. ही गोड बातमी लवकरच मिळणार आहे, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

===================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2019 05:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com