Elec-widget

भाजपकडून 'तारीख पे तारीख', अखेर या नेत्याला असा करावा लागला प्रवेश

भाजपकडून 'तारीख पे तारीख', अखेर या नेत्याला असा करावा लागला प्रवेश

भाजपकडून प्रवेशासाठी 'तारीख पे तारीख' मिळाल्यानंतर अखेर माजी मुख्यमंत्री नारायण राणे याचे पुत्र नितेश राणे यांना अखेर कणकवलीच्या भाजप कार्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागला.

  • Share this:

दिनेश केलूसकर,(प्रतिनिधी)

कणकवली, 3 ऑक्टोबर: भाजपकडून प्रवेशासाठी 'तारीख पे तारीख' मिळाल्यानंतर अखेर माजी मुख्यमंत्री नारायण राणे याचे पुत्र नितेश राणे यांना अखेर कणकवलीच्या भाजप कार्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागला. भाजपाचे कणकवली विधानसभेचे अधिकृत उमेदवार म्हणून नितेश राणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यामुळे  नारायण राणेंचाही  जीव एकदाचा भांड्यात पडला आहे.

नितेश राणेंचे हृदय आता 'कमल'दलापाशी गुंतणार आहे. कणकवलीच्या भाजप कार्यालयात येऊन त्यांनी भाजपाचे सदस्यत्व स्विकारले. नितेश राणे कणकवली विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उद्या (4 ऑक्टोबर) नितेश राणे उमेदवारी अर्ज दाखल करतील. नितेश राणे यांना भाजपचा AB फॉर्म देण्यात येईल.

भाजपच्या आदरातिथ्याने राणे भारावले..

भाजप कार्यालयात येताना जरासे संकोचलेले नितेश राणे आदरातिथ्याने भारावून गेले. यापूढे संपूर्ण कोकणात भाजपला एक नंबरचा पक्ष करु, अशी ग्वाही देत त्यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या स्थानिक नेत्यांचे आभार मानले.

Loading...

खरंतर नारायण राणेंनी स्वत:हून अनेक वेळा भाजप प्रवेशाची तारीख दिली. पण शिवसेनेच्या जोरदार विरोधामुळे राणेंसह त्यांच्या दोन्ही चिरंजीवांचा भव्यदिव्य प्रवेश होऊ शकला नाही. पण उमेदवारी हवी असेल तर आधी भाजपचा सदस्य होणे आवश्यक असल्यामुळेच नितेश राणेंना कणकवलीच्या भाजप कार्यालयात येऊन स्थानिक नेत्यांच्या हस्ते प्रवेश घ्यावा लागला. दरम्यान, नितेश राणेंच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढणार असली तरी नारायण राणे आणि शिवसेनेत असलेले मतभेद पाहता सिंधुदुर्गात शिवसेना भाजपतली दरी आता आणखी वाढणार आहे. ज्याचे परिणाम या निवडणुकीत दिसणार आहेत त्यामुळे सिंधुदुर्गात तरी या निवडणुकीत भाजप-शिवसेनेचाच सामना पाहायला मिळणार आहे.

VIDEO: नितेश राणेंनी हात सोडून दिली कमळाला साथ; उद्या भरणार उमेदवारी अर्ज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 3, 2019 03:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...