मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, आदित्य ठाकरेंविरोधात अजूनही कुणी नाही!

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. एकूण 45 उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2019 07:24 PM IST

मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, आदित्य ठाकरेंविरोधात अजूनही कुणी नाही!

मनसे, 02 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. एकूण 45 उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. परंतु, या यादीत वरळी मतदारसंघातून उमेदवारी अजूनही देण्यात आली नाही. वरळी मतदारसंघातून शिवसेनेकडून आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहे. काका राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलं आहे.

या दुसऱ्या यादीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून काही पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसंच मनसेनं याआधी 27 उमेदवारांची यादी जाहीर केली होती.

आहे मनसेचे 45 उमेदवार

डोंबिवली - मंदार हळबे

धुळे (शहर) - प्राची कुलकर्णी

Loading...

जळगाव (शहर) - जमील देशपांडे

जळगाव (ग्रामीण) - मुकुंद रोटे

अमळनेर - अंकलेश पाटील

अकोट - रवींद्र फाटे

रिसोड - विजयकुमार उल्लामाळे

कारंजा - सुभाष राठोड

पुसद - अभय गेडाम

नांदेड उत्तर - गंगाधर फुगारे

परभणी - सचिन पाटील

गंगाखेड - विठ्ठल जवादे

परतूर - प्रकाश सोळंखे

वैजापूर - संतोष जाधव

भिवंडी पश्चिम - नागेश मुकादम

भिवंडी पूर्व - मनोज गुडवी

कोपरी-पाचपाखाडी - महेश कदम

ऐरोली - निलेश बाणखेले

अंधेरी पश्चिम - किशोर राणे

चांदिवली- सुमीत भारस्कर

राजूरा - महालिंग कंठाडे

राधानगरी - युवराज येडूरे

अंबरनाथ - सुमेत भंवर

डहाणू - सुनिल निभाड

बोईसर - दिनकर वाढान

शिवडी - संतोष नलावडे

विलेपार्ले - जुईली शेंडे

किनवट - विनोद राठोड

फुलंब्री - अमर देशमुख

उमरखेड- रामराव वानखेडे

घाटकोपर पूर्व - सतीश पवार

अणुशक्तीनगर - विजय रावराणे

मुंबादेवी - केशव मुळे

श्रीवर्धन - संजय गायकवाड

महाड - देवेंद्र गायकवाड

सावंतवाडी - प्रशांत रेडकर

श्रीरामपूर - भाऊसाहेब पगारे

बीड - बैभव काकडे

मोहळ- हनुंत भोसले

उमरेड - मनोज बावनगडे

विशेष म्हणजे, राज ठाकरे हे सुरुवातीला विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हते. मात्र कार्यकर्त्यांनी त्यांना आग्रह केल्याने राज ठाकरे यांनी निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला. EVM विरुद्ध राज ठाकरे यांनी देशव्यापी आंदोलन छेडलं होतं. EVMनेच निवडणूक होणार असेल तर आपण बहिष्कार घालायला पाहिजे असं राज यांचं मत होतं मात्र बहिष्कार घालण्याचा निर्णय हा आम्हाला परवडणारा नाही असं शरद पवार म्हणाले होते. त्यामुळे बहिष्काराचा निर्णय मागे पडला. नाही हो म्हणत मनसेनं निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि पहिली 27 जणांची यादी जाहीर केली.

हे आहेत मनसेचे उमेदवार

कल्याण ग्रामीण - प्रमोद राजू रतन पाटील

कल्याण पश्चिम - प्रकाश भोईर

नाशिक पूर्व - अळोक मुर्तडक

माहिम - संदीप देशपांडे

हडपसर - वसंत मोरे

कोथरूड - किशोर शिंदे

नाशिक मध्य - नितीन भोसले

वणी - राजू उंबरकर

ठाणे- अविनाश जाधव

मागाठाणे - नयन कदम

कसबा पेठ - अजय शिंदे

सिंदखेडा - नरेंद्र धर्मा पाटील

नाशिक पश्चिम - दिलीप दातीर

इगतपुरी - योगेश शेवरे

चेंबूर - कर्णबाळा दुनबळे

कलिना - संजय तुर्डे

शिवाजीनगर - सुहास निम्हण

बेलापूर - गजानन काळे

हिंगणघाट - अतुन वंदिले

तुळजापूर - प्रशांत नवगिरे

दहिसर - राजेश येरूणकर

दिंडोशी - अरुण सुर्वे

कांदिवली पूर्व - हेमंत कांबळे

गोरेगाव - विरेंद्र जाधव

वर्सोवा - संदेश देसाई

घाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कल

वांद्रे पूर्व - अखिल चित्रे

===============================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 2, 2019 07:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...