SPECIAL REPORT : मोदींचा सुपरहीट फॉर्म्युला खरा होणार, सेनेची डरकाळीच ठरणार?

SPECIAL REPORT : मोदींचा सुपरहीट फॉर्म्युला खरा होणार, सेनेची डरकाळीच ठरणार?

फडणवीस यांची पुन्हा एकदा भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. पण फडणवीसांसाठी सोपा दिसणारा सिंहासनापर्यंतचा मार्ग सेनेनं अडीच वर्षं मुख्यमंत्रिपदाचा हट्ट धरल्यानं थोडा कठीण बनला.

  • Share this:

मुंबई, 06 नोव्हेंबर : दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र असा शब्द खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेत दिला होता. त्यामुळे महाराष्ट्राचा कारभार पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याच हाती येण्याची दाट शक्यता आहे.

दिल्लीत नरेंद्र राज्यात देवेंद्र...गेल्या अनेक वर्षांपासून घुमत असलेला हा नारा 2019 मध्ये पुन्हा एकदा दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदींनीच दिला.

त्याची आठवण आता येण्याचं कारण म्हणजे गेल्या 12 दिवसांपासून राज्यात शिगेला पोहोचलेला सत्तासंघर्ष...देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. पण फडणवीसांसाठी सोपा दिसणारा सिंहासनापर्यंतचा मार्ग सेनेनं अडीच वर्षं मुख्यमंत्रिपदाचा हट्ट धरल्यानं थोडा कठीण बनला. पण सरकार आपलंच आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री, असा ठाम निर्धार भाजपच्या नेत्यांनी मुंबईतल्या बैठकीनंतर व्यक्त केला.

भाजप नेत्यांचे हे शब्द मोदींची भूमिकाच अधोरेखित करणार आहेत. मोदी आणि फडणवीस यांच्या कामाच्या पद्धतीतही कमालीचं साम्य आहे. दिल्लीत मोदींनी जसं विरोधकांना निष्प्रभ करून टाकलं. तसंच गेल्या पाच वर्षांत फडणवीस यांनी राज्यात करण्याचा प्रयत्न केला.

मोदींनी पक्षांतर्गत विरोधकांना जसं वानप्रस्थाश्रम दाखवलं. तोच कित्ता फडणवीसांना राज्यात गिरवला म्हणूनच खुद्द मोदींनी नरेंद्र आणि देवेंद्रची बरोबरी करून टाकली.

मोदींच्या पावलावर पाऊल टाकत फडणवीसांना मी पुन्हा येईन, अशी घोषणा करून टाकली. आता ते कोंडीत सापडले असले तरी त्यांना खात्री आहे ती म्हणजे मोदी आपल्या शिष्याला वाऱ्यावर सोडणार नाहीत.

=================

First published: November 6, 2019, 10:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading