SPECIAL REPORT : सेनेसोबत चर्चा केल्यावर हायकमांड नेत्यांवर नाराज का?

SPECIAL REPORT : सेनेसोबत चर्चा केल्यावर हायकमांड नेत्यांवर नाराज का?

राज्यात सत्तास्थापनेविषयी थेट शिवसेनेशी चर्चा केल्यामुळं राज्यातील काँग्रेस हायकमांड राज्यातील नेत्यांवर नाराज झाल्याची चर्चा आहे

  • Share this:

प्रशांत लीला रामदार, प्रतिनिधी

दिल्ली, 15 नोव्हेंबर : राज्यात सत्तास्थापनेविषयी थेट शिवसेनेशी चर्चा केल्यामुळं राज्यातील काँग्रेस हायकमांड राज्यातील नेत्यांवर नाराज झाल्याची चर्चा आहे. गुरुवारी रात्री काँग्रेस राष्ट्रवादी आणि  शिवसेना अशी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली.

राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आता नवी आघाडी उदयास येवू घातली आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सत्ता वाटपावरून चर्चेचा सीलसीला सुरू झाला आहे. गुरुवारी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची मुंबईत एक बैठक झाली. मात्र, या पहिल्याचं बैठकीवर काँग्रेस हायकमांडनं नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जातं आहे. काँग्रेस नेत्यांनी थेट शिवसेनेशी केलेली चर्चा काँग्रेस हायकमांडला फारशी रुचली नाही.

खरं तर शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करण्याच्या सूचना काँग्रेस हायकमांडनं राज्यातील  नेत्यांना दिल्या होत्या.

राष्ट्रवादीशी एकमत झाल्यानंतरचं सेनेशी चर्चा होणार होती.  मात्र, प्रत्येक्षात काँग्रेस नेत्यांनी थेट शिवसेनेशी चर्चा केली.त्यामुळेच काँग्रेस हायकमांड नाराज असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

सोनिया गांधीच्या निवासस्थानी काँग्रेस वरिष्ठ नेत्यांची एक बैठक पार पडली. त्यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.एकीकडं सत्तास्थापनेसाठी दोन्ही काँग्रेसचा पाठिंबा मिळण्यास उशीर होत असल्यामुळं शिवसेनेची धाकधुक वाढली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस हायकमांड राज्यातील नेत्यांवर नाराज झाल्यामुळे सेनेच्या जीवाला घोर लागला आहे.

Published by: sachin Salve
First published: November 15, 2019, 10:10 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading