भाजपची मुंबईत बैठक, सत्ता संघर्षावर ठरणार नवा प्लॅन!

भाजपची मुंबईत बैठक, सत्ता संघर्षावर ठरणार नवा प्लॅन!

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला असला तरीही सत्ता स्थापन करता आलेली नाही.

  • Share this:

अभिषेक पांडे, प्रतिनिधी

मुंबई, 14 नोव्हेंबर : राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापनेसाठी जोर बैठका घेत आहे. तर दुसरीकडे वेट अँड वॉच भूमिकेत असलेल्या भाजपची महत्त्वाची बैठक मुंबईत सुरू आहे. या बैठकीमध्ये पुन्हा निवडणुकीला कामा लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आल्याची माहिती, विश्वसनिय सूत्रांनी दिली आहे.

मुंबईतील दादर येथील वसंत स्मृती इथं भाजपची बैठक सुरू आहे. या बैठकीला भाजपचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे आमदार बैठकीला उपस्थित आहेत.

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला असला तरीही सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामुळे निवडून आलेल्या आमदारांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी सभागृहात भाजप नंबर वन असे लिहून आमदारांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न आहे. आजच्या बैठकीला सहयोगी पक्षाचे आमदारही उपस्थित आहेत.

या बैठकीआधी आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार आहे. तसंच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यांना मदत कशी मिळावी, याबद्दल चर्चा आणि भाजपच्या अंतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम ठरला आहे. त्यावरही चर्चा होणार आहे, अशी माहिती शेलार यांनी दिली.

दरम्यान, शिवसेना आणि आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यांनी अजूनही सरकार स्थापन करण्याबद्दल दावा केला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल रणनीती आखली जाणार आहे. सर्व कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पक्षासाठी जे जे होईल ते करणार असे संकेत दिले होते. तसंच राष्ट्रवादीचे 9 आमदार भाजपच्या सर्पंकात असल्याचा गौप्यास्फोट खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला. आपल्या पक्षाच्या आमदारानी पक्षांतर करू नये यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेने काळजी घेतली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे 9 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. निंबाळकर यांच्या विधानामुळे राजकीय खळबळ उडाली.

===============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2019 09:10 PM IST

ताज्या बातम्या