SPECIAL REPORT : सेनेला उत्तर देण्यासाठी भाजप आक्रमक, काय आहे 'प्लॅन बी'?

SPECIAL REPORT : सेनेला उत्तर देण्यासाठी भाजप आक्रमक, काय आहे 'प्लॅन बी'?

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 12 दिवस उलटले असले तरी राज्यातलं सत्तानाट्य संपलेलं नाही. पण, भाजपची आक्रमक भूमिका पाहता या नाट्यावर लवकरच पडदा पडेल

  • Share this:

विवेक कुलकर्णी,प्रतिनिधी

मुंबई, 05 नोव्हेंबर : राज्यात सत्तास्थापनेचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. सेना ऐकत नसेल तर भाजपनंही प्लॅन बी तयार ठेवला आहे. बघुया काय आहे हा प्लॅन बी?

चर्चेसाठी भाजपच्या आवाहनाला दाद न देणाऱ्या सेनेला जेरीस आणण्यासाठी भाजपनं प्लॅन बी तयार केला आहे.त्यानुसार 2014 प्रमाणेच शपथविधी उरकून नंतर सेनेची कोंडी करण्याची तयारी भाजप करत असल्याचं समजतं आहे.

शपथविधीचा छोटेखानी समारंभ लवकरच होईल, असं भाजप नेते सांगत आहे. त्यासाठी काही आमदार गैरहजर राहतील यांची खबरदारी घेत विधिमंडळात बहुमताचा आकडाच खाली आणण्याचा करण्याचा डाव भाजप टाकू शकतो. चर्चेसाठी सेनेच्या प्रस्तावाची वाट बघत असल्याचं सागून भाजपनं चेंडू उद्धव ठाकरेंच्या कोर्टात टोलवला.

इकडे दररोज पत्रकार परिषदा घेऊन संजय राऊत सेनेची भूमिका आक्रमकपणे मांडत आहेत. सत्तेत समसमान वाटा, अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद हा सेनेचा हट्ट कायम आहे.

पण सेनेच्या या आक्रमक भूमिकेला तितकंच आक्रमक उत्तर देण्याची तयारी भाजपनं केल्याचं दिसतंय. कोणत्याही परिस्थितीत सेनेला मुख्यमंत्रिपद न देण्यावर भाजप ठाम आहे. सेनाच जनमताचा अनादर करत नसल्याचा आरोप भाजपनं केला.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 12 दिवस उलटले असले तरी राज्यातलं सत्तानाट्य संपलेलं नाही. पण, भाजपची आक्रमक भूमिका पाहता या नाट्यावर लवकरच पडदा पडेल, असं दिसतंय.

===============

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2019 09:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading