SPECIAL REPORT : सेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपची पुन्हा 2014 ची खेळी?

SPECIAL REPORT : सेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपची पुन्हा 2014 ची खेळी?

संजय राऊतांची आक्रमक भाषा आणि खुद्द उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर नाराजी यामुळे सध्यातरी हा सत्तासंघर्ष तापलेला दिसत आहे

  • Share this:

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 01 नोव्हेंबर : राज्यातला सत्तासंघर्ष आता वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता भाजपनंही चक्क शपथविधीची तयारी करत सेनेला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे.

राज्यात सत्तास्थापनेचा संघर्ष शिगेला पोहोचलेला असतानाच भाजपनं आक्रमक भूमिका घेत शपथविधीचा मुहूर्त ठरवला. येत्या 5 किंवा 6 तारखेला वानखेडे स्टेडियमर शपथविधीचा जंगी कार्यक्रम करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेना सोबत आली तर ठीक अन्यथा भाजप स्वत:च्या मंत्र्यांचा शपथविधी उरकून घेणार आहे.

भाजपची ही योजना 2014 सारखीच आहे. 2014 सालीसुद्धा भाजप-शिवसेनेत सत्तानाट्य अनेक दिवस रंगलं. शिवसेनेनं सुरुवातीला विरोधात बसण्याची भूमिका घेत भाजपवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला.

पण त्यावेळीही शरद पवारांच्या गुगलीनं सेनेचा डाव फसला. राष्ट्रवादीनं न मागताच भाजपला पाठिंबा जाहीर केल्यानं सेनेची कोंडी झाली आणि अखेर दीड महिन्यांनी सेना नमतं घेत सरकारमध्ये सहभागी झाली. इतकंच नाही तर मिळेल ती खाती पदरात पाडून घेण्याची वेळ सेनेवर आली. 2014च्या या खेळीचा गौप्यस्फोट पाच वर्षांनंतर खुद्द पवारांनीच केला.

यावेळी पवारांनी निकालाच्या दिवशीच विरोधी बाकावर बसणार असल्याचं जाहीर करत शिवेसेनेची तडजोडीची ताकदच कमी करून टाकली. पण निवडणुकीचे निकाल लागून आठवडा लोटला तरी सत्तानाट्य संपायचं नाव घेत नाही.

संजय राऊतांची आक्रमक भाषा आणि खुद्द उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर नाराजी यामुळे सध्यातरी हा सत्तासंघर्ष तापलेला दिसत आहे. म्हणूनच 2014 सारखी भूमिका घेत भाजपनं एकतर्फी शपधविधीची तयारी सुरू केली. यावेळी सेनेचा वाघ डरकाळी फोडणार की भाजपच्या मागे फरफटत जाणार हे लवकरच कळेल.

================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2019 09:14 PM IST

ताज्या बातम्या