SPECIAL REPORT : सेनेच्या वचननाम्यावर ठाकरे घराण्याच्या तिसऱ्या पिढीचा छाप, हे आहे घोषवाक्य!

SPECIAL REPORT : सेनेच्या वचननाम्यावर ठाकरे घराण्याच्या तिसऱ्या पिढीचा छाप, हे आहे घोषवाक्य!

शिवसेनेच्या वचननाम्यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचा प्रभाव पाहायला मिळत आहे. शनिवारी 'मातोश्री'वर या वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं.

  • Share this:

मुंबई, 12 ऑक्टोबर : शिवसेनेनं जाहीर केलेल्या वचननाम्यावर ठाकरे घराण्यातील तिसऱ्या पिढीची छाप आहे. सेनेच्या यंदाच्या वचननाम्यावर आदित्य ठाकरेंचा प्रभाव पाहायला मिळत आहे.

शिवसेनेच्या वचननाम्य़ावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचा प्रभाव पाहायला मिळत आहे. शनिवारी 'मातोश्री'वर या वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. भगव्या वस्त्रात हा वचननामा गुंडाळून आणला होता. या वचननाम्यात शिवसेनेनं अनेक वचनं मतदारांना दिली आहेत. शहरी तसंच ग्रामीण जनतेला डोळ्यासमोर ठेवून हा वचननामा तयार करण्यात आला.

काय आहे वचननामा?

शेतमजूर, ऊसतोडणी कामगारांना निवृत्ती वेतन

मासेमारी बंदी काळात कोळी बांधवांना अनुदान

कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना

उद्योग आणि शेती पर्यटन विकासाला चालना

कोकण निवड मंडळ पुन्हा सुरू करणार

2019 पर्यंतची बांधकामं नियमित करणार

50 वर्षं जुन्या म्हाडाच्या सर्व इमारतींचा पुनर्विकास

बीडीडी चाळींचा पुनर्विकास

डिजिटल शाळा आणि व्हर्च्युअल क्लास रूम

सरकारी शाळांतून उत्तीर्ण झालेल्यांना शासकीय नोकरीत प्राधान्य

प्रत्येक जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

नदी स्वच्छता अभियानासाठी नवीन खातं

सर्व शहरं डम्पिंगमुक्त करणार

नफ्यासाठी कोचिंग शाळा उघडणाऱ्यांवर कारवाई

महिला वर्गालाही प्राधान्य

'शिवसेना जे बोलते ते करते' असं घोषवाक्य विधानसभा निवणुकीच्या निमित्तानं तयार केलं आहे. विशेष म्हणजे वचननाम्याच्या प्रत्येक पानावर विविध योजनेच्या माध्यमातून मराठी माणला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. दहा रुपयात थाळी देण्याचं आश्वासन शिवसेनेनं दिलं आहे. मात्र त्यामुळं राज्याच्या तिजोरीवर किती बोजा पडेल याचाही विचार करण्यात आला आहे. शिवसेनेचा हा वचननामा पाहाता त्यावर आदित्योदयची छाप असल्याची शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे.

============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 10:26 PM IST

ताज्या बातम्या