मुंबई, 13 जुलै : रायगड (Raigad)मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर (river overflow) आला आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या जीवाशी खेळून पूर आलेल्या नदीवरुन पुल एसटी चालकाने (ST driver) ओलांडल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी घेतली आहे. या प्रकरणी अनिल परब यांनी तातडीने कारवाई करत संबंधित एसटी चालकाचे निलंबन (ST driver suspended) केले आहे.
परिवहन मंत्री @advanilparab यांच्या @msrtcofficial च्या 'त्या' बस चालकावर कारवाई, नदीला पूर असताना एसटी नेणारा वाहनचालक निलंबित #RaigadST #ViralVideo #Flood #Raigad
— News18Lokmat (@News18lokmat) July 13, 2021
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नद्या ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान रायगड जिल्ह्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातून एसटी चालकाने गाडी नेली. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून एसटी चालकाने केलेल्या या धाडसामुळे जोरदार टीका होत आहे.
VIDEO: ST चालकाचं जीवघेणं धाडस, प्रवाशांच्या जीवाशी खेळ pic.twitter.com/fccpY2ZqZL
— News18Lokmat (@News18lokmat) July 13, 2021
महाड तालुक्यातील रेवतळे फाटा येथील खाडीपट्टयात जाणाऱ्या रस्तावर नदीला आलेल्या पूराच्या पाण्यात एसटी नेण्याचा प्रकार समोर आला आहे. नदीच्या पुलावरुन पाणी ओसंडून वाहत असताना एसटी चालकाने प्रवाशांचा जीव धोक्यात टाकून भलतयं धाडस दाखवलं.
रायगडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागेश्वरी बंधारा उलटून पाणी ओसंडून वाहत होते. या पाण्यात खाडीपट्टयात जाणारा रस्ता ही बुडाला. यावेळी एसटी चालकाने प्रवाशांच्या जीवाची पर्वा न करता भलतचं धाडस केलं आणि एसटी थेट ओसंडून वाहणाऱ्या पुलावरुन नेली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil parab, Raigad, ST