काय आहे जीआर? शासन निर्णयात म्हटले आहे की, यापूर्वी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा 24 नोव्हेंबर 2017 चा शासन निर्णय आणि 20 डिसेंबर 2017 चे शासन शुद्धीपत्र यामधील तरतुदींनुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10वी) परीक्षेमध्ये अतिरिक्त गुणांची सवलत देता येईल. 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये शासकीय रेखाकला परीक्षा 2020 चे आयोजन करण्यात येणार नसल्यामुळे कला शिक्षण प्रशिक्षण पदविका (ए.टी.डी.) आणि मुलभूत अभ्यासक्रम (फाउंडेशन) या दोन अभ्यासक्रमांना सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून सूट देण्यात येत आहे. मूक-बधिर असलेली श्रेया रॉय ठरली UPSC परीक्षेत दुसऱ्याच प्रयत्नात टॉपर; अपार मेहनत घेत मिळवलं यश 2020-21 वर्षासाठीच सूट प्रस्तुत सूट ही 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये कला शिक्षण प्रशिक्षण पदविका (ए. टी. डी.) आणि मुलभूत अभ्यासक्रम (फाउंडेशन) या दोन अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपुरतीच व सन 2020-21 या शैक्षणिक वर्षापुरतीच मर्यादित राहील. शासन निर्णयात पुढे म्हटलं आहे, सन 2020-21 या वर्षी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस (इयत्ता दहावी) बसलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तथापि कोविड 19 च्या परिस्थितीमध्ये त्यांना इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस बसता न आल्याने ते परीक्षा उत्तीर्ण होवू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना एलिमेंटरी ड्ऱॉईंग ग्रेड परीक्षेस मिळालेली श्रेणी इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेसाठी प्रदान करण्यात यावी. या श्रेणीच्या आधारे केवळ शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये इयत्ता 10वी परीक्षेमध्ये अतिरिक्त गुणाची सवलत देण्यात यावी.महत्त्वाची सूचना : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये जे दहावीचे विद्यार्थी यापूर्वी शासकीय रेखा कला परीक्षेत(एलिमेंटरी व इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड)उत्तीर्ण झाले आहेत, ते विद्यार्थी मंडळाच्या प्रचलित धोरणांनुसार अतिरिक्त गुणांसाठी पात्र आहेत. अधिक माहितीसाठी पुढील GR पहा.#sscexams #SSC pic.twitter.com/Ch6Nvxpjye
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) June 16, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Ssc board, Varsha gaikwad