शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तीयांना अटक, मुलाची आज पुन्हा चौकशी

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तीयांना अटक, मुलाची आज पुन्हा चौकशी

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या आडचणी वाढणार?

  • Share this:

मुंबई, 26 नोव्हेंबर : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सरनाईक यांच्या निकटवर्तीयांना ईडीनं अटक केल्याची माहिती मिळाली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची निकटवर्तीय आणि मोठ्या पदावर असलेले अमित चंडोळे यांना ईडीनं दोन दिवसांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतलं आहे. मंगळवारी त्यांची ईडीकडून करण्यात आली होती. चौकशी पूर्ण झाल्यानंतर ईडीनं चंडोळे यांना ताब्यात घेतलं असून प्रताप सरनाईक यांच्या मुलाला देखील गुरुवारी पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीनं छापेमारी केली होती. त्यानंतर ईडीकडून सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक यांची देखील चौकशी करण्यात आली होती. पुन्हा चौकशी करण्यासाठी विहंगला गुरुवारी ईडीसमोर हजर रहावं लागणार आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे जुने निवासस्थान आणि समता नगरमधील मुख्य जनसंपर्क कार्यालय ज्या इमारतीत आहे त्याच इमारतीत छाबियास विहंग सोसायटीत अमित चंडोळे राहतात. अमित चंडोळे हे आमदार प्रताप सरनाईक यांचे बालपणीचे मित्र आहेत. प्रताप सरनाईक यांच्यासोबत ते डोंबिवलीहून ठाण्यात व्यवसायासाठी आले. दोघांनी मिळून व्यवसाय सुरू केला. विहंग ग्रूप ऑफ कंपनीला मोठा फायदा होत गेला. अमित चंडोळे सध्या या कंपनीच्या डायरेक्टरपदावर आहेत. याशिवाय वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये देखील त्यांची भागीदारी आहे. टॉप सिक्युरीटी आणि विहंग ग्रुप ॲाफ कंपनी यांच्यातील मुख्य दुवा म्हणजे अमित चंडोळे आहे असं सांगितलं जात आहे.

हे वाचा-प्रताप सरनाईक झाले क्वारंटाइन, ईडीकडे मागितला आठवड्याभराचा वेळ

प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना आज पुन्हा चौकशीला बोलावले आहे. सोमवारी विहंग यांची 6 तास चौकशी केली होती. सरनाईक कुटुंबीय मुंबईलाच असल्याची माहिती असल्यामुळे ईडीने चौकशीला बोलावले आहे. दुसरीकडे अमित चंडोळे यांचा मोठा सहभाग टॉप सिक्युरीटीमध्ये असल्याने आणि त्यांचा विहंग ग्रुप ॲाफ कंपनीशी संबंध असल्याने विहंग सरनाईक आणि प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ईडीनं आज बोलवलं आहे. अमित चंडोळेमुळेच प्रताप सरनाईक आणि कुटुंबीय अडचणीत आल्याची सध्या चर्चा आहे. अमित चंडोळे यांच्या अटकेनंतर प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही ईडीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. विंहग सरनाईक यांच्या चौकशीनंतर ईडीकडून काय कारवाई केली जाणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 26, 2020, 7:25 AM IST

ताज्या बातम्या