Home /News /mumbai /

COVID-19: कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ कायम, जाणून घ्या कोरोनाचे सर्व अपडेट्स

COVID-19: कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ कायम, जाणून घ्या कोरोनाचे सर्व अपडेट्स

आरोग्य यंत्रणा नुसती टेस्टिंगच करून थांबली नाही तर कोविड रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांनी त्या माणसांना आयसेलोट केलं. त्यामुळे प्रसार रोखण्यात मदत झाली.

आरोग्य यंत्रणा नुसती टेस्टिंगच करून थांबली नाही तर कोविड रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांनी त्या माणसांना आयसेलोट केलं. त्यामुळे प्रसार रोखण्यात मदत झाली.

Maharashtra Corona Update: राज्यात सध्या 1,27,603 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

    मुंबई 29 ऑक्टोबर: सलग गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांमध्ये होत असलेली वाढ कायम आहे. गुरुवारी (29 ऑक्टोबर) 7,883 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 14,94,809 एवढी झाली आहे. दिवसभरात 5,902 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 16,66,668 एवढी झाली आहे. तर 156 जणांचा मृत्यू झाला. राज्यात आत्तापर्यंतच्या मृत्यूची संख्या ही 43,710 झाली आहे. राज्यात सध्या 1,27,603 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. राज्य सरकारने रेल्वे पोलिसांना (Railway Police) दंड करण्याचे अधिकार दिले आहेत. रेल्वेत मास्क न घालता प्रवास केला तर हा दंड होणार आहे. त्यामुळे लोकलने प्रवास करणार असाल तर मास्क विसरणार नाही याची काळजी घ्या नाहीतर जबर दंड होऊ शकतो. महापालिकेने यासंदर्भात दंडाची जी तरतूद केली आहे त्यानुसार रेल्वे पोलीस आता दंड आकारू शकणार आहेत. सरकारने अनेकदा सांगूनही प्रवासी मास्कशिवाय प्रवास करत असल्याचं आढळून आल्याने प्रशासनाने ही कडक भूमिका घेतली आहे. मास्क घातला नाही तर 200 रुपये दंडाची तरतूद मुंबई महापालिकेने केली आहे. हा दंड दुप्पट वाढविण्याचाही सरकारचा विचार असल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले सात महत्त्वाचे निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पाठोपाठ खासदार सुनील तटकरे आणि आता राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. दिलीप वळसे पाटील हे कॅबिनेट बैठकीसाठी आज सकाळी मंत्रालयात आले होते. कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर ते तात्काळ मंत्रालयातून निघून गेले. वळसे पाटील यांनी तुर्तास विलिगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. Coronavirus चे नवे रुग्ण देशात कमी होत असतानाच काही राज्यांत आणि शहरात मात्र दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा वाढायला लागली आहे. विशेषतः सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारातली गर्दी वाढत असतानाच ही Covid-19 ची तिसरी आणि मोठी लाट असू शकते, अशी चिंता राजधानीच्या  (Coronavirus 3rd wave) आरोग्यमंत्र्यांनीच व्यक्त केली आहे. मुंबईत रेल्वेने प्रवास करणार असाल तर सावधान, नाहीतर होऊ शकतो जबर दंड राजधानी दिल्लीत (Coronavirus in delhi) मुंबईप्रमाणेच मोठ्या संख्येने रुग्णवाढ झाली. पण ती वेळीच रोखण्यात यश आलं. त्यानंतर लॉकडाऊन संपताच पुन्हा एकदा संख्या वाढली, ती कमी होते आहे हे लक्षात येत असतानाच नवरात्र, दुर्गापूजा आणि दसऱ्यानिमित्ता लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले, प्रवास करू लागले आणि दिल्लीत आता रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ही कोरोनाची तिसरी लाट असू शकते, असं खुद्द दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांनी म्हटलं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या