राज्याचा Recovery Rate 89 टक्क्यांच्या जवळ, दिवसभरात 6 हजार 417 रुग्णांची भर

राज्याचा Recovery Rate 89 टक्क्यांच्या जवळ, दिवसभरात 6 हजार 417 रुग्णांची भर

राज्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 16,38,961 एवढी झाली आहे. तर 14,55,107 जण कोरोनामुक्त झाले. तर आत्तापर्यंत 43,152 जणांचा मृत्यू झाला.

  • Share this:

मुंबई 24 ऑक्टोबर: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येतली घट सलग गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. तर कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असून राज्यांचं कोरोनामुक्तीचं प्रमाण हे 89 टक्क्यांच्या जवळ गेलं आहे. शनिवारी राज्यात 10,004 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 6,417 रुग्णांची नव्याने भर पडली. राज्यात 137 जणांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 16,38,961 एवढी झाली आहे. तर 14,55,107 जण कोरोनामुक्त झाले. तर आत्तापर्यंत 43,152 जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 1,40,194 एवढ्या रुग्णांवर उपचार सुरू आहे.

कोरोनाचा हॉट स्पॉट बनलेल्या पुण्यात आता कोरोना रुग्णांची संख्या घसरणीला लागली आहे. रुग्ण बरे होणाऱ्या शहरांमध्ये पुण्याचा देशात पहिला क्रमांक असल्याची आकडेवारी पुढे आलीय.

पुण्याचा कोरोना रिकव्हरी रेट 92.81 टक्के एवढा आहे. चेन्नई, दिल्लीला मागे टाकत पुणे देशात नंबर वन झाले आहे. कोरोनाच्या बाबतीत पुणे बनलं होतं नंबर वन तेच पुणे आता रिकव्हरीत बनलं नंबर वन. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

चेन्नईचा रिकव्हरी रेट 92.68, दिल्ली - 90.76, तर मुंबईचा 88.81 टक्के एवढा आहे. शनिवारी दिवसभरात पुण्यात 329 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर दिवसभरात 774 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.

पुण्यात 23 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला त्यातले 4 रूग्ण पुण्याबाहेरचे आहेत. सध्या 685 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 366 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 59 हजार 406 झालीय. तर 6 हजार 885 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत 4 हजार 105 जणांचा मृत्यू झालाय. तर 1 लाख 48 हजार 416 जणांनी कोरोनावर मात केली.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 24, 2020, 9:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या