राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ कायम, उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठी घट

राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ कायम, उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठी घट

राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 18,59,367वर गेली आहे. तर 53 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात आत्तापर्यंत 47,827 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

मुंबई 08 डिसेंबर: राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ कायम आहे. मंगळवारी 6,365 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही 17,37,080वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 4,026 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 18,59,367वर गेली आहे. तर 53 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात आत्तापर्यंत 47,827 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनाबाधितांच्या (corona) संख्येत सातत्याने घट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी (8 डिसेंबर 2020) सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासांत 26,567 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 385 हून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 5 महिन्यांच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे या आकडेवारीवरुन स्पष्ट होते.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 4.10 टक्के केसेस ॲक्टिव्ह आहेत. 94.45 टक्के कोरोनाबाधित बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 1.45 टक्के रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात 3,83,866 रुग्ण ॲक्टिव्ह असून, 91,78,946 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 1,40,958 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशात 39,045 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 12,863 ने घटली आहे. तसेच 385 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या कोरोनाबाधितांची संख्या 97,03,770 आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने (ICMR) दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी देशभरातील 10,26,399 नागरिकांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत देशभरात 14,88,14,055 नागरिकांची कोरोनाच्या अनुषंगाने चाचण्या करण्यात आल्या.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 8, 2020, 10:00 PM IST

ताज्या बातम्या