COVID-19: राज्यात नव्या रुग्णांमध्ये 40 टक्क्यांची घट, तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली

COVID-19: राज्यात नव्या रुग्णांमध्ये 40 टक्क्यांची घट, तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली

राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा हा 40,349 एवढा झाला आहे. तर 10 हजार 461 जणांनी कोरोनावर मात केली.

  • Share this:

मुंबई 11 ऑक्टोबर: राज्यात रविवारी (11 ऑक्टोबर) दिवसभरात 10,792 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांच संख्या ही 15,28,226 एवढी झाली आहे. तर 309 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा हा 40,349 एवढा झाला आहे. तर 10 हजार 461 जणांनी कोरोनावर मात केली.

मागील 4 आठवडयातील रुग्णसंख्येचे विश्लेषण केले असता दर आठवडयाला नव्याने आढळणारे बाधित रुग्ण कमी होताना दिसत आहेत. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडयात 1 लाख 53 हजार 331 एवढे नवे रुग्ण आढळले होते. त्यांची संख्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडयात 92 हजार 246 एवढी आहे. त्यामुळे रुग्ण संख्येत जवळपास 40 टक्के घट झाली आहे.

10 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या काळात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात 70.72 टक्क्यांवरुन 82.76 टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली आहे.

या सोबतच प्रयोगशाळा नमुन्यांमधील पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण हे 24.6 टक्क्यांवरुन 15.6 टक्क्यांवर आले आहे.

मागील चार आठवड्यात प्रयोगशाळा तपासणीत थोडी घट होताना दिसत आहे. याची दोन प्रमुख कारणे आहेत - पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या  दैनंदिन स्वरुपात  कमी होत असल्याने स्वाभाविक या बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची संख्या कमी होत आहे आणि फिवर क्लिनिक मध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील कमी होत असल्याचे निरीक्षण रुग्णालयांनी नोंदविले आहे.

15 तारखेपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय, मात्र राज्यांची तयारी नाही; हे आहे कारण

10 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत प्रतिदिन चाचण्यांची संख्या 80 हजारांच्या घरात आहे. परिणामी 10 सप्टेंबर रोजी असणारा पॉझिटिव्हीटीचा दर हा 24.60 टक्क्यांवरून 10 ऑक्टोबर रोजी 15.06 टक्क्यावर आला आहे.

भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 8 दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या 1 हजारांपेक्षा कमी झालीय.

बाप रे! त्वचेवर तब्बल 9 तास राहू शकतात कोरोनाचे विषाणू, अशी घ्या काळजी

कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 60 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. देशातल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूची एकूण संख्या ही 1,08,334 एवढी झाली आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही देशात जास्त असून भारत जगात पहिल्या स्थानावर आहे.

देशात सर्वाधिक रुग्ण संख्या असणाऱ्या 5 राज्यांमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 54.3 टक्के एवढी आहे. भारतात कोरोनामुक्तीचा दर हा 86.17 एवढा आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ही 60,77,976 एवढी झाली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 11, 2020, 8:36 PM IST

ताज्या बातम्या