COVID-19: राज्यात दिवसभरात 424 जणांचा मृत्यू, कोरोना रुग्णांच्या संख्येने पार केला 14 लाखांचा टप्पा

COVID-19: राज्यात दिवसभरात 424 जणांचा मृत्यू, कोरोना रुग्णांच्या संख्येने पार केला 14 लाखांचा टप्पा

तर दिवसभरात 15,591 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 14 लाख 16 हजार 513 एवढी झाली आहे.

  • Share this:

मुंबई 02 ऑक्टोबर: राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत होणारी वाढ कायम आहे. शुक्रवारी दिवसभरात 424 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूची एकूण संख्या ही 37 हजार 480 एवढी झाली आहे. तर दिवसभरात 15,591 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 14 लाख 16 हजार 513 एवढी झाली आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ‘मास्क’ हा सर्वात प्रभावशाही उपाय आहे हे आता जगातल्या सर्वच तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणं हे सक्तिचं करण्यात आलं आहे. पण नागरिक तो नियम पाळत नाहीत त्यामुळे मुंबई महापालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) कारवाईकर करत मास्क न घालणाऱ्या बेशिस्त नागरिकांकडून 60 लाखांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे.

महापालिकेने 20 एप्रिल ते 1 ऑक्टोबर दरम्यान ही कारवाई केली. आता ही कारवाई अधिक कडक करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

पालिकेने मास्क न घालणाऱ्या मुंबईकरांकडून 60 लाख 48 हजार 500 रुपये वसूल केले. एकूण 18 हजार 118 जणांकडून हा दंड वसूल करण्यात आला.

तर रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून 1 लाख 46 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. असे 852 रस्त्यावर थुंकणारे मुंबईकर दंडित झाले आहेत.

मास्क न घालणाऱ्यावर सगळ्यात जास्त कारवाई पाश्चिम उपनागरात कांदिवली इथं करण्यात आली. तर रस्त्यावर थुंकणारे सगळ्यात जास्त मुंबईकर एन वॉर्ड म्हणजे घाटकोपर मध्ये करण्यात आली.

तर सगळ्यात कमी कोरोनाग्रस्त असलेल्या बी वॉर्ड आणि सी वॉर्ड मिळून 2655 मास्क न घालणारे मुंबईकर दंडीत करण्यात आले.

मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि सतत हात धुणे या तीन गोष्टींचा अवलंब केला तर कोरोनापासून बचाव होऊ शकतो असं तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 2, 2020, 8:29 PM IST

ताज्या बातम्या