Home /News /mumbai /

कोरोना रुग्णांच्या मृत्यूसंख्येत मोठी वाढ, 3 आठवड्यानंतर पहिल्यांदाच संख्या शंभरच्या पुढे

कोरोना रुग्णांच्या मृत्यूसंख्येत मोठी वाढ, 3 आठवड्यानंतर पहिल्यांदाच संख्या शंभरच्या पुढे

coronavirus त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 18,32,176 झालीय. तर 5,027 रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ही 16,95,208 झालीय.

    मुंबई 02 डिसेंबर: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्येत चढ उतार होत आहे. मात्र गेल्या 3 आठवड्यांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या दोन आकडी होती. आज दिवसभरात 111 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ही 47,357 एवढी झाली आहे. दिवशभरात 5,600 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 18,32,176 झालीय. तर 5,027 रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ही 16,95,208 झालीय. राज्यात सध्या 88,537 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्व जगाला लॉकडाऊनमध्ये (Lockdown) टाकणाऱ्या कोरोनाच्या लसीसंदर्भात (Coronavirus Vaccine)  दोन मोठ्या बातम्या आल्या आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin)  यांनी पुढच्या आठवड्यापासून देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण (Mass Vaccination) करण्याचे आदेश दिल्याचं वृत्त आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेनं दिलं आहे. सर्व जग कोरोनावरचं औषध शोधत असतांनाच रशियाने ‘स्पुतनिक-V’ (Sputnik V) औषध शोधून बाजी मारल्याचा दावा केला होता. त्याचं मानवी परिक्षणही यशस्वी ठरल्याचा दावाही रशियाने केला होता. हे औषध खुद्द पुतीन यांच्या मुलीलाच दिलं गेल्याचंही जाहीर करण्यात आलं होतं. सुरुवातीच्या टप्प्यात भारतात 30 कोटी लोकांचं लशीकरण होणार आहे. जुलै 2020 पर्यंत 50 कोटी डोस बनवण्याची आणि 25 कोटी लोकांचं लशीकरण करण्याची योजना आहे. भारतात निवडणुकीत जसे मतदान केंद्रं असतात तशी कोरोना लशीकरणासाठी केंद्र तयार करण्याचा विचार सरकारचा आहे. विभागनिहाय तयारी केली जाईल. सरकारी किंवा खासगी डॉक्टरांना या मोहीमेची विशेष जबाबदारी सोपवली जाईल. मतदान केंद्रांप्रमाणे टीमही तयार केल्या जातील. लोकांनाही यात सामावून घेतलं जाईल, त्यांना आवश्यक प्रशिक्षण दिलं जाईल.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या