मुंबई, 5 जून: महाराष्ट्रात (Maharashtra) लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधांचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. राज्यातील रुग्णवाढीला ब्रेक लागला असून रिकव्हरी रेट सातत्याने वाढत (Recovery rate increased) आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेल्या तीन महिन्यांत प्रथमच 95 टक्क्यांवर पोहोचले आहे. आज दिवसभरात राज्यात कोरोनाचे 21 हजार 776 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 55 लाख 28 हजार 834 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
तीन महिन्यात प्रथमच घडलं असं
गेल्या तीन महिन्यांत आज प्रथमच सर्वात कमी म्हणजेच 13 हजार 659 रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात 10 मार्च 2021 रोजी आजच्या इतकेच रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. पण आता रुग्णवाढीला ब्रेक लागला असून रुग्ण संख्येत सातत्याने घसरण होत आहे.
सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 88 हजार 027 इतकी झाली आहे. राज्यात आज 300 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी 211 मृत्यू हे मागील 48 तासांतील तर 89 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 1.71 टक्के इतका झाला आहे.
आज कुठल्या विभागात किती रुग्ण?
ठाणे मंडळ - 2792
नाशिक मंडळ - 1379
पुणे मंडळ - 3442
कोल्हापूर मंडळ - 3586
औरंगाबाद मंडळ - 371
लातूर मंडळ - 843
अकोला मंडळ - 773
नागपूर मंडळ - 473
एकूण - 13,659
सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेले जिल्हे
पुणे - 22280
मुंबई - 18118
कोल्हापूर - 18130
ठाणे - 16801
सातारा - 15246
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Maharashtra, Mumbai