मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच; आज 63309 रुग्णांचे निदान तर मृतकांचा आकडा धडकी भरवणारा

राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच; आज 63309 रुग्णांचे निदान तर मृतकांचा आकडा धडकी भरवणारा

21 ऑक्टोबर रोजी रुग्ण दुप्पटीचा दर 100 दिवसांवर गेला होता. 29  ऑक्टोबरला 157 दिवसांचा टप्पा ओलांडला होता.

21 ऑक्टोबर रोजी रुग्ण दुप्पटीचा दर 100 दिवसांवर गेला होता. 29 ऑक्टोबरला 157 दिवसांचा टप्पा ओलांडला होता.

Maharashtra covid19 updates: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 28 एप्रिल: आज राज्यात (Maharashtra) नव्याने बाधित झालेल्या रुग्णांच्या संख्येने (Covid positive patients) पुन्हा एकदा 60 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. केवळ बाधितांचा आकडा मोठा नाहीये तर मृतकांच्या संख्येतही वाढ होत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) ब्रेक द चेन (Break the chain) अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहेत. यामुळे वाढत्या रुग्ण संख्येला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. मात्र, ही रुग्ण संख्या काही कमी होताना दिसत नाहीये.

आज राज्यात 63,309 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 61,181 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.4 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.5 टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,65,27,862 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 44,73,394 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 42,03,547 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 31,159 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती रुग्ण पाहूयात

अ.क्रजिल्हा महानगरपालिकाबाधित रुग्णमृत्यू
दैनंदिनएकूणदैनंदिनएकूण
मुंबई महानगरपालिका४९२६६४०४०९७८१२९५४
ठाणे९९१८१९१४१०८९
ठाणे मनपा९४२१२०३०५९२१५६४
नवी मुंबई मनपा७१७१००५२७१३११
कल्याण डोंबवली मनपा११२७१२५७०३१२३२
उल्हासनगर मनपा१४३१८८२२४०४
भिवंडी निजामपूर मनपा४५१०१२४३८३
मीरा भाईंदर मनपा४२९४६५८४१०७८३
पालघर८२६३२३४२३४४
१०वसईविरार मनपा९२८५३१६५८७९
११रायगड११०२६२३१९१२१२५६
१२पनवेल मनपा६०६५६१८१११८१६
 ठाणे मंडळ एकूण१२७८२१३४८३९५२२०२३०१५
१३नाशिक१५२६१०६८९०३११२७६
१४नाशिक मनपा३२१३१८७९६३१५२२
१५मालेगाव मनपा१०८८३५२०१
१६अहमदनगर२३७२११३२४५२०१२०७
१७अहमदनगर मनपा५८२५११३४१२७०५
१८धुळे२४५२०९९८२४०
१९धुळे मनपा११०१६२३६१९३
२०जळगाव८१८८८१३६१२१४१७
२१जळगाव मनपा१६५२८०२५४४०
२२नंदूरबार९७४३३३३०४३५१६
 नाशिक मंडळ एकूण१००१५६५४७९२१३७७७१७
२३पुणे३४३०१९९०९८३२२४४७
२४पुणे मनपा४१२६४२१४९६११७५३५५
२५पिंपरी चिंचवड मनपा१९१६२००७६३२०१४९०
२६सोलापूर१६५३७५४२९१४८६
२७सोलापूर मनपा२४०२५९९०९८१
२८सातारा१७७२९८०७०३८२२२१
 पुणे मंडळ एकूण१३१३७१०२०८४६२१७१३९८०
२९कोल्हापूर६६६४४६४९१३१३
३०कोल्हापूर मनपा२२५१९३१८४५६
३१सांगली११७१५२२७११११३०५
३२सांगली मिरज कुपवाड मनपा२८५२४३७८७१५
३३सिंधुदुर्ग१३५१२१४७१४३१३
३४रत्नागिरी१०५६२१९३३५१८
 कोल्हापूर मंडळ एकूण३५३८१७४६९६४७४६२०
३५औरंगाबाद९६३३९६२२४५३
३६औरंगाबाद मनपा५०९८२४९०८०१४६५
३७जालना८८१४३०२२१३६१३
३८हिंगोली३१७१३२१११५१६९
३९परभणी७४४१९४२३११३०४
४०परभणी मनपा२५२१४६३५२५७
 औरंगाबाद मंडळ एकूण३६६६२१२४०३१२५३२६१
४१लातूर८९८५०५५०२४७४०
४२लातूर मनपा२७०१८७४१३५१
४३उस्मानाबाद७८४३७५३४८६८
४४बीड१३६७५१९५९१०८६२
४५नांदेड४५१३९००८१०८७६
४६नांदेड मनपा१९५४०७९९६९१
 लातूर मंडळ एकूण३९६५२३८५९१६४४३८८
४७अकोला८२१४४०५२०९
४८अकोला मनपा३०९२५२९१४००
४९अमरावती४१६२५२५७४५४
५०अमरावती मनपा१८०३७१४९४०८
५१यवतमाळ९८७४७७३७३२९०३
५२बुलढाणा१००८४३२०८३६१
५३वाशिम४४०२६२८६१४२६६
 अकोला मंडळ एकूण३४२२२१९३३३६२३००१
५४नागपूर२५६६९३७८२१४१२२९
५५नागपूर मनपा५४१८३१२४२४६९३७९६
५६वर्धा१०७७४०२१७५१५
५७भंडारा१३१८४८६३१४४६
५८गोंदिया४६९३१४८८३३३
५९चंद्रपूर८९३३७७७५३९०
६०चंद्रपूर मनपा४५४२१०६३२२१
६१गडचिरोली५८९१८८१२१८४
 नागपूर एकूण१२७८४६०४१९२११३७११४
 इतर राज्ये /देश१४६११८
 एकूण६३३०९४४७३३९४९८५६७२१४

राज्यात आज 985 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 352 मृत्यू हे मागील 48 तासांतील तर 251 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 342 मृत्यू हे एका आठवड्यापेक्षा अदिक कालावधीपूर्वीचे असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Maharashtra