Home /News /mumbai /

Maharashtra Rain: पुढील आठवड्यात 'या' जिल्ह्यांत बरसणार पाऊस, पाहा कुठल्या जिल्ह्यात कशी असेल स्थिती

Maharashtra Rain: पुढील आठवड्यात 'या' जिल्ह्यांत बरसणार पाऊस, पाहा कुठल्या जिल्ह्यात कशी असेल स्थिती

महाराष्ट्र मध्ये मागील चार दिवसांमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक लोकांचा जीव गेला आहे जनजीवन विस्कळीत झाले आहे आता येत्या आठवड्यामध?

मुंबई, 25 जुलै : महाराष्ट्रात विशेषतः मुंबई (Mumbai) आणि कोकण (Konkan) किनारपट्टी भागामध्ये गेले चार दिवस मुसळधार पाऊस (Heavy rainfall) होत असल्याने अनेक लोकांचे जीव गेले आहेत. तसेच लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, जनजीवन कोलमडून पडले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागांमध्ये अनेक नद्यांना पूर आला आहे. अनेक नद्या क्षमतेपेक्षा अधिक पाण्याच्या प्रवाहाने वाहत आहेत. अनेक ठिकाणी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांत नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. आता कुलाबा वेधशाळेने येत्या आठवड्यासाठी पावसाच्या संदर्भात अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या या अंदाजानुसार आठवड्यातील पहिले दोन-तीन दिवस काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे. पण 25 जुलै ते 29 जुलै दरम्यान अनेक भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांमध्ये अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी काळजी घेण्याचंही कुलाबा वेधशाळेने सांगितलं आहे. Konkan Flood: एनडीआरएफच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात एक टीम उभारणार : मुख्यमंत्री मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात या भागांमध्ये पावसाचा जोर थोडा कमी होणार आहे. मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, या भागांमध्ये मात्र काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याच्या पद्धतीने आपत्कालीन परिस्थिती याचीदेखील तयारी करण्याच्या सूचना कुलाबा वेधशाळेने राज्य सरकारला दिले आहेत. महाड येथे दरड कोसळून देखील अनेकांचे जीव गेले त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह पाहणी केली. आज स्वतः मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर प्रत्यक्ष पाहणीला आहेत. त्याच वेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हेदेखील घटनास्थळी पाहणी करत आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार खेड तालुक्यातील पुराचा फटका बसलेल्या अनेक भागांमध्ये पाहणी करून राज्य शासनाच्या वतीने मदतीचे आश्वासन दिले आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये देखील यावर महत्त्वपूर्ण चर्चा होणार असून राज्य सरकारच्या वतीने नुकसानग्रस्त लोकांसाठी मदतीची घोषणा करण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी 2 चक्रीवादळामुळे कोकणात करोडो रुपयांचं नुकसान झालं होतं. राज्य शासनाच्या वतीने त्यावेळेस देखील वेगळी पॅकेज जाहीर करण्यात आले होते. मात्र विरोधकांकडून या पॅकेज बाबतची घोषणा फक्त हवेत असून प्रत्यक्षात मात्र जितकी गरज आहे तितकी गरज मिळाले नसल्याचा आरोप केला गेला होता. आता पुरामुळे फटका बसलेल्या लोकांना राज्य सरकार मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने अजून मदत जाहीर करते का याकडे लक्ष लागले आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Mumbai, Rain

पुढील बातम्या