मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या कांदिवलीतील पोइसर नदीच्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचेही स्थलांतरण करण्यात येत आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. Rain updates: मुंबईत मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी भरले; तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणामMumbai | Roads waterlogged in Gandhi Market area following incessant rainfall. pic.twitter.com/xp8hZDA6TJ
— ANI (@ANI) July 16, 2021
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोकल ट्रेनच्या ट्रॅकवर पाणी आल्याचं पहायला मिळत आहे. मध्य रेल्वेच्या कुर्ला-विद्याविहार स्टेशन दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी आले आहे. परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशीराने सुरू आहे. तर हार्बर रेल्वेची वाहतूक सुद्धा 20 - 25 मिनिटे उशीरा सुरू आहे. पुढील 3 तासांत मुसळधार हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन तासांत मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घरातून बाहेर पडावे तसेच सुरक्षिततेची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. कोकणात अतिवृष्टीचा इशारा कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तिन्ही जिल्ह्यांना हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड तालुक्यात पहाटे पासून पावसाने पुन्हा जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. रात्री पावसाने उसंत दिल्याने राजापूर कोदवली नदीला आलेला पूर ओसरला होता. त्यामुळे राजापुर बाजार पेठेचा धोका टळला होता. जिल्ह्यातील सर्वच नद्या पूर्वपदावर वाहत होत्या परंतु पहाटे पासून कोसळणार्या पावसामुळे पुन्हा आज दिवसभरात परिस्थिती हाताबाहेर जाते की काय अशी भीती व्यक्त होत आहे.कुर्ला-सायन स्टेशन दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचले#MumbaiRain #CentralRailway pic.twitter.com/qbxr4NCBgs
— News18Lokmat (@News18lokmat) July 16, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.