मुंबई, 27 मे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पोलीस उपनिरीक्षक (PSI) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या स्वरुपात ( PSI exam pattern) आता बदल करण्यात आला आहे. शारीरिक चाचणीमध्ये (physical test) 100 पैकी 60 गुण मिळवणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे. 60 गुणांपेक्षा कमी गुण मिळाल्यास संबंधित परीक्षार्थी मुलाखतीसाठी (interview) पात्र ठरणार नाही. त्यामुळं या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांना त्यांच्या तयारीच्या प्रक्रियेतही बदल करावा लागणार आहे.
गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पीएसआय पदी काम करणाऱ्या माणसाला फिल्डवर भरपूर काम करावं लागतं, त्यासाठी या पदावर असणारा व्यक्ती तेवढा तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. परीक्षार्थी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचून अनुत्तीर्ण होण्यापेक्षा आधीच त्याची शारीरिक क्षमता तपासणं महत्वाचं आहे. शारीरिक चाचणीमध्ये अपयशी ठरल्यास परीक्षार्थी दुसऱ्या पर्यायांचाही विचार करू शकतो. त्यामुळं ही अट घातली असावी, असं काही तज्ज्ञांच म्हणणं आहे.
शारीरिक चाचणीमध्ये 60 गुण मिळवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. तसेच शारीरिक चाचणीतील एकूण गुणांची बेरीज ही अपूर्णांकात असल्यास ती अपूर्णांकातच ठेवून चाचणीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या चाचणीमध्ये कमी गुण मिळाल्यास उमेदवार मुलाखतीला पात्र ठरू शकणार नाही. त्यामुळं आता शारीरिक चाचणीला जास्त महत्त्व आलं आहे. तसेच या गुणांचा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही, असंही आयोगानं स्पष्ट केले आहे.
हे वाचा - रमेश पोवार कोच झाल्यानंतर कॅप्टन मिताली राजची पहिली प्रतिक्रिया, वाचून वाटेल अभिमान
पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण करायची असेल तर शारीरिक चाचणी आणि मुलाखत महत्वाचा भाग असणार आहे. पूर्वपरीक्षा ही 100 गुणांची असते. पीएसआय, एसटीआय या सर्व पदांसाठी ही एकच परीक्षा असते. त्यामधून फक्त मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविले जाते. हे गुण मुख्य परीक्षेमध्ये ग्राह्य धरले जात नाही. पण, मुख्य परीक्षा वेगवेगळी असते. यामध्ये पदांसंबंधी एक वेगळा पेपर असतो. पीएसआय पदासंबंधी माहिती त्या पेपरमध्ये विचारलेली असते. ही परीक्षा 200 गुणांची असते. त्यानंतर 100 गुणांची शारीरिक चाचणी आणि 40 गुणांची मुलाखत असते. मुख्य परीक्षेचे 200, शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचे 140 गुण असे एकूण 340 पैकी निकाल लागत होता. मात्र, आता यामध्ये बदल करण्यात आला आहे.
मैदानात द्यावा लागणार जास्त वेळ -
पीएसआयच्या परीक्षांना इतर परीक्षांप्रमाणं लेखीवरच जास्त लक्ष केंद्रित करावं लागत होतं. विद्यार्थी पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा झाल्यानंतर शारीरिक चाचणीचा सराव करण्यावर भर द्यायचे. मात्र, आता असं करून चालणार नाही. अगोदरच्या नियमांनुसार 20 गुण मिळाले तरी मुलाखत आणि मुख्य परीक्षेच्या गुणांमुळं परीक्षार्थी उत्तीर्ण व्हायचा. मात्र, आता तसे होणार नाही. त्यामुळं पीएसआय बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आधी शारीरिक चाचणीकडं लक्ष देणं गरजेचं आहे. शारीरिक चाचणीसाठी आता परीक्षार्थींना जास्त घाम गाळावा लागणार आहे.
शारीरिक चाचणी आहे अशी
पुरुषांसाठी
महिलांसाठी -
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mpsc examination