Home /News /mumbai /

आदित्य ठाकरेंच्या टीकेनंतर एकनाथ शिंदे यांचं शिवसैनिकांना भावनिक आवाहन, म्हणाले..

आदित्य ठाकरेंच्या टीकेनंतर एकनाथ शिंदे यांचं शिवसैनिकांना भावनिक आवाहन, म्हणाले..

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. यानंतर आता मंत्री एकनाथ शिंदे (Shivsena leader Eknath Shinde) यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं आहे.

    मुंबई, 25 जून : राज्यात सध्या राजकीय घटनांनी (Maharashtra Politics crisis) वातावरण गढूळ होताना दिसत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shivsena leader Eknath Shinde) यांच्या कथित बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav thackeray) आता मैदानात उतरले असून बंडोखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडण्यात आली. यावेळी त्यांनी आपण शिवसेनेला हायजॅके केलेलं नाही. तर राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाने शिवसेनेला हायजॅक केलं, अशी भूमिका मांडली. दरम्यान, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं आहे. एकनाथ शिंदे काय म्हणाले? मंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित आपल्या भावाना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, "प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, महाविकास आघाडीचा खेळ ओळखा. महाविकास आघाडीच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिताकरीता समर्पित आहे. आपला एकनाथ संभाजी शिंदे." 'विधानसभेला जाणारा रस्ता वरळीतूनच जातो', आदित्य ठाकरेंचं आतापर्यंतचं सर्वात आक्रमक भाषण दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले? "आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन जात आहोत. आम्ही शिवसेनेचेच सदस्य आहोत. आम्ही कुणाच्याही दबावाखाली बंड पुकारलेलं नाही. एकनाथ शिंदे हे आमच्या गटाचे नेते आहेत. आम्ही शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलो आहोत. आमच्याकडे दोन तृतीयांश सदस्य आहेत", असं दीपक केसरकर म्हणाले. "आमची संख्या 55 झाली आहे. 55 आमदारांचा नेता बदलवायचा असेल तर तो 16 लोकं एकत्र येऊन बदलवू शकत नाहीत. त्यामुळे जो काही निर्णय विधानसभेच्या उपाध्यक्षांनी दिलेला आहे त्या निर्णयाला आम्ही कोर्टात आव्हान देऊ. आमच्याकडे दोन तृतीयांश संख्या आहे. त्यामुळे कायद्यानुसार आम्हाला आमचा नेता निवडण्याचा अधिकार आहे", असं केसरकर म्हणाले. आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले? "कार्यकर्त्यांचा हा उत्साह बघितल्यानंतर मला तोच दिवस आठवतो जेव्हा मी माझी उमेदवारी जाहीर केली होती. माझा आवाज जरी इथपर्यंतच हॉलमध्ये येत असला तरी तुमचा आवाज गुवाहाटीपर्यंत पोहोचला आहे. भास्कर जाधव यांनी सांगितलं की, मुंबई आणि मुंबई महापालिकेवर सगळ्यांचा डोळा आहे. भास्करराव तुम्ही बरोबर बोललात की, मुंबईवर भाजपचा डोळा आहे. मुंबईत एवढे वर्ष आपण शिवसेना म्हणून राहिलो आहेत जरी मुंबईवर कुणाचा डोळा असला तरी आपण मुंबईला कुणाची नजर लागू दिलेली नाही", असं आदित्य ठाकरे म्हणाले.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Aaditya thackeray, Eknath Shinde

    पुढील बातम्या