Home /News /mumbai /

बाळासाहेबांच्या विचारांचा मीच वासरदार? एकनाथ शिंदे यांनी बदलला फेसबुक DP

बाळासाहेबांच्या विचारांचा मीच वासरदार? एकनाथ शिंदे यांनी बदलला फेसबुक DP

संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदी घोषणा केल्यानंतर आता शिंदे यांनी आपल्या फेसबुकचा DP बदलला आहे. यामुळे अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  मुंबई, 30 जून : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मुख्यमंत्रीपदी घोषणा झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यावेळी भूमिका मांडताना एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांचे आभार मानले. "देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला. त्यांनी शिवसैनिकाला पाठिंबा दिला. खरंतर त्यांना 120 आमदारांचा पाठिबा होता. पण, तरीही त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला", असं एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्रीपदाची घोषणा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी फेसबुकवरील आपला DP बदलला आहे. एकनाथ शिंदे यांच्या DP ने वेधलं सर्वाचं लक्ष एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून सातत्याने दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या उच्चार केला आहे. आम्ही शिवसेना सोडली नसून शेवटपर्यंत सेनेतच राहणार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. याहीपुढे जाऊन खरी शिवसेना आमचीच असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची? यावरुन संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, शिंदे यांनी आपल्या फेसबुकवरील दर्शन छायाचित्र बदललं आहे. यात शिंदे बाळासाहेब ठाकरे यांच्या पायाशी बसलेले दिसत आहे. यातून पुन्हा एकदा शिवसेना आमचीच असाच काहीसा संदेश ते देत असावेत अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

  देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला, बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला : एकनाथ शिंदे

   एकनाथ शिंदे काय म्हणाले?
  "आम्ही जो निर्णय घेतला आहे त्याबाबत मी आपल्याला बोललो आहे की, बाळासाहेबांचे हिदुत्व, त्यांची भूमिका आणि राज्यातील विकास या भूमिका घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. आम्ही जवळपास 50 आमदार एकत्र आहोत. वैचारिक भूमिका, राज्याचा विकास आणि अडीच वर्षात जे काही घडलं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. गेल्या काही काळात आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आपल्या मतदारसंघातील समस्या आणि अडचणींची वारंवार माहिती दिली. मीदेखील अनेकवेळा त्यांच्याबरोबर चर्चा केली. आपली जी नैसर्गिक युती होती, आपण एकत्र निवडणूक लढवली आणि महाविकास आघाडी स्थापन झाली. मतदारसंघातील प्रश्न आणि येत्या निवडणुकीतील अडचणी विचारात घेऊन निर्णय घेतला आहे. कुणाला काही मंत्रिपद पाहिजे म्हणून हा निर्णय घेतलेला नाही. राज्याच्या हिताच्या दृष्टीने जे काही घडत होते, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांवर झालेल्या कारवाई, अनेक निर्णय घेता येत नव्हते. काही चांगले निर्णय झाले आहेत. त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे. महाविकास आघाडीमुळे ते काम आधी झालं नाही. 50 आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात याचा अर्थ त्याचं कारण आणि आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता होती", असं एकनाथ शिंदे म्हणाले.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Eknath Shinde, Uddhav thackarey

  पुढील बातम्या