Live Updates : शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना मातृशोक

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 12, 2022, 23:36 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:12 (IST)

  नागपूर - पुलावरून वाहन कोसळल्याचं प्रकरण
  6 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले होते
  'घटनेत काहींचा मृत्यू झाल्याचं ऐकून दु:ख झालं'
  माझ्याकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली - फडणवीस
  या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे - फडणवीस
  बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न
  नागपूर जिल्हाधिकाऱ्यांशी मी संपर्कात - फडणवीस
  'मृतांच्या वारसदारांना सरकार 4 लाखांची मदत देणार'

  21:52 (IST)

  मुंबईतील धारावी परिसरात गोळीबार
  एकानं पत्नी, नातेवाईकांवर केला गोळीबार
  आर्थिक व्यवहाराच्या वादातून गोळीबार
  गोळीबार करणाऱ्याला पोलिसांकडून अटक
  मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू

  21:50 (IST)

  सिरम इन्स्टिट्यूटला भारतातील पहिल्या गर्भाशयाच्या कर्करोगाच्या लसीसाठी डीसीजीआयची मंजुरी

  21:40 (IST)

  पंढरपूर - विठ्ठल सहकारी साखर कारखाना
  अभिजीत पाटील पॅनेलनं निवडणूक जिंकली
  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
  फडणवीसांकडून अभिजीत पाटील पॅनेलचं कौतुक
  विजयात प्रवीण दरेकरांचं मोलाचं सहकार्य

  21:25 (IST)
  'त्या' मृत्युमुखी पडलेल्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मदत, भगवान काळेंच्या दोन्ही मुलांचं शैक्षणिक पालकत्व मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलं, मृत शिवसैनिकाच्या कुटुंबीयांशी एकनाथ शिंदेंनी संवाद साधून केलं सांत्वन
   
  20:56 (IST)

  पालघर जिल्ह्यात मासेमारीसाठी गेलेल्या 2 मच्छीमारांचा समुद्रात बुडून मृत्यू

  20:14 (IST)

  मुंबई पालिकेतही शिवसेनेला खिंडार पडण्यास सुरुवात, शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे एकनाथ शिंदे गटात सामील

  19:52 (IST)

  कोल्हापूर - शिंदे गटातील आमदार प्रकाश अबिटकरांनी वाय प्लस दर्जाची सुरक्षा नाकारली, एस्कॉर्टसुद्धा काढून घेण्याची केली विनंती, शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर अबिटकरांना दिली होती सुरक्षा, निवासस्थानची सुरक्षा व्यवस्था मात्र कायम ठेवणार, आवश्यकता असेल तरच वाय प्लस सुरक्षा आणि एस्कॉर्ट देण्याची केली विनंती

  19:50 (IST)

  श्रीनगर - लाल बाजार इथं दहशतवाद्यांचा गोळीबार
  पोलीस चौकीवरील गोळीबारात 3 पोलीस जखमी

  19:11 (IST)

  मराठी नामफलकांबाबत पूर्ततेसाठी दिनांक 30 सप्टेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ, व्यापारी संघटनांच्या विनंतीच्या आधारे महापालिका प्रशासनाचा निर्णय, वाढीव मुदतीत देखील सुधारणा न केल्यास कारवाई

  कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स