Home /News /mumbai /

'मंडळ चालवत आहेत की पक्ष?', मनसेनं शिवसेनेला पुन्हा डिवचलं

'मंडळ चालवत आहेत की पक्ष?', मनसेनं शिवसेनेला पुन्हा डिवचलं

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) शिवसेनेला (Shivsena) पुन्हा एकदा डिवचलं आहे.

    मुंबई, 3 जुलै : शिवसेनेचे उपनेते आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील  (Shivajirao Ahalrao Patil) यांच्या विषयावर पक्षाची चांगलीच फजिती झाली आहे. आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाल्याचं वृत्त शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'दैनिक सामना'मध्ये छापून आले होते. त्यानंतर काही तासांमध्येच पक्षानं यु टर्न घेत ही कारवाई मागे घेतली आहे. सामना दैनिकातील बातमी अनावधानाने छापण्यात आली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेना उपनेते म्हणून शिवसेनेतच कार्यरत आहेत. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे. शिवसेनेतील या गोंधळावर मनसेनं टोला लगावला आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale, MNS) यांनी ट्विट करत शिवसेनेला डिवचलं आहे. 'संपलेल्या पक्षात आता कोणी उरतं की नाही या भीतीने आढळराव यांच्यावरची कारवाई मागे ... मंडळ चालवत आहेत की पक्ष?' असा टोला काळे यांनी शिवसेनेला लगावला आहे. राज यांनीही केली होती टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही त्यांना सुनावले होते. 'माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तुत्व समजू लागतो त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो, अशी  प्रतिक्रिया राज यांनी व्यक्त केली होती. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरेंची पहिलीच इन्स्टाग्राम पोस्ट; कॅप्शनने वेधलं लक्ष मनसे आणि शिवसेनेतील संबंध गेल्या काही महिन्यांपासून ताणले आहेत. मशिदीवरील भोंगे, औरंगाबादचे नामांतर या प्रश्नावर दोन्ही पक्ष आमने-सामने आले होते. त्यानंतर राज्यसभा निवडणूक, विधानपरिषद निवडणूक आणि आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही मनसेच्या एकमेव आमदारानं भाजपाच्या बाजूनं मतदान केले आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: MNS, Shivsena

    पुढील बातम्या