मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'शरद पवारांनी स्वप्न पाहू नये,''त्या' वक्तव्यावर शिंदे गटाकडून चोख उत्तर

'शरद पवारांनी स्वप्न पाहू नये,''त्या' वक्तव्यावर शिंदे गटाकडून चोख उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे.

नवी दिल्ली, 13 जुलै : राज्यातील सत्ता परिवर्तन लोकांना आवडलेलं नाही, त्यामुळे आगामी काळात लवकरच  एक वेगळे चित्र पाहण्यास मिळेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला होता. पवारांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesrkar) यांनी दिले आहे.

शरद पवार यांनी स्वप्न पाहू नयेत, असा सल्ला केसरकर यांनी दिला आहे. भाजपाच्या वतीनं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीसाठी केसरकर दिल्लीत आले आहेत. त्यावेळी 'News18 लोकमत' शी बोलताना केसरकर यांनी हा सल्ला दिला. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांची भाषा बोलायची आहे की उद्धव ठाकरे यांची याचा निर्णय लवकर घ्यावा असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

काय म्हणाले होते पवार?

आज शिवसेनेमध्ये जे घडत आहे, त्यामुळे शिवसैनिक कुठेही हलला नाही. ज्यांनी सत्ता मिळवण्यासाठी बंड केला आहे. त्यांच्याविरोधात सर्व शिवसैनिक एकवटले आहे. राज्यात जे काही सत्ता परिवर्तन झाले आहे. ते लोकांना आवडलेले नाही. त्यामुळे राज्यात आगामी काळात वेगळे चित्र पाहण्यास मिळणार आहे, असं पवारांनी सांगितले होते.

सीएम शिंदेंना गुरू पोर्णिमेलाच धनुष्यबाण आणि उद्धव ठाकरेंचा विसर, चर्चेला उधाण

उद्धव ठाकरेंचा पाठिंबा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. आदिवासी व्यक्तीला राष्ट्रपती होण्याची संधी पहिल्यांदाच मिळत असल्यानं त्यांना पाठिंबा द्यावा अशी बहुतेक खासदारांची मागणी होती. या मागणीचा विचार करून कोणत्या दडपणाशिवाय आपण हा निर्णय घेतला असल्याचं ठाकरे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

First published:

Tags: Shivsena, शरद पवार. sharad pawar