Home /News /mumbai /

सर्वात मोठी राजकीय घडामोड! दिल्लीवारीनंतर फडणवीस अ‍ॅक्शनमोडमध्ये, राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर

सर्वात मोठी राजकीय घडामोड! दिल्लीवारीनंतर फडणवीस अ‍ॅक्शनमोडमध्ये, राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर

संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र

राज्यातील घडामोडींना वेग आला असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पाच आमदारांसोबत राज्यपालांच्या भेटीसाठी राज्यभवनावर दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.

  मुंबई, 28 जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर पहिले काही दिवस भाजपच्या गोटात शांतताच होती. पण, गेल्या दोनतील दिवसांपासून आता भाजपच्या गोटात वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 11 जुलैपर्यंत सुनावणी पुढे ढकल्यानंतर बैठकांना वेग आला आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. दिल्लीतील वरीष्ठ नेत्यांसोबत बैठक बोलावण्यात आली होती. ते दिल्लीवरुन परतले असून राज्यपालांच्या भेटीसाठी राज्यभवनावर दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे हे गेल्या 7 दिवसांपासून गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. आज सातव्यादिवशी भाजपच्या गोटामध्ये कालपासून घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीत भाजप वरिष्ठ नेत्यांसोबत तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले होते. खाजगी विमानाने मुंबईहुन दिल्लीला गेले होते. महाराष्ट्रातील सत्ता नाट्यावर नवी दिल्लीत महत्वाची चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाचे वकिल महेश जेठमलानी हे फडणवीस यांच्यासोबत होते. महेश जेठमलानी हे राम जेठमलानी यांचे पुत्र आहे.

  अजित पवार सुरक्षा सोडून दोन तास कुठे गेले? मंत्र्याच्या संशयामुळे खळबळ

  फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राज्यभवनावर दाखल दिल्लीहून परतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राज्यभवनावर दाखल झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता हे सत्तानाट्य फार काळ चालेल असं वाटत नाही. यापुढे कशी पावलं टाकायची किंवा दिल्लीवाल्यांचा काय निरोप आहे, यावर या दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे भेटण्याची वेळ मागितली होती. यावेळी फडणवीस यांच्यासोबत 5 आमदारही आहे. दुसरीकडे शिंदे गट 30 जूनपर्यंत मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती सुत्रींनी दिली आहे. यामध्ये चंद्रकांत पाटील, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर आणि आणखी दोन आमदार आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांसह 21 जून रोजी सुरतला दाखल झाले होते. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली होती. शिवसेनेनं शिंदेंना परत बोलावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण, ते काही परत आले नाही. त्याच दिवशी 21 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचे समोर आले आहे. पण फडणवीस यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर मुख्यमत्र्यांनी त्यांना मेसेज केला पण त्यात मजकूर काय हे मात्र कळू शकले नाही. असाच प्रकार 2019 झाला होता. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधण्यासाठी बरेचदा फोन केले होते. पण त्यावेळे उद्धव ठाकरे यांनी फोन उचलले नव्हते. आता तीच वेळ उद्धव ठाकरेंवर आली.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde

  पुढील बातम्या