मुंबई, 22 जून : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन संवाद साधत शिवसेनेतील बंडखोरांना भावनिक आवाहन केलं. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रिपदी नको असेन तर काय करायचं? सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा माझ्यासमोर येऊन सांगायचं, तुम्ही मुख्यमंत्रिपदी नको.मी राजीनामा देण्यास तयार आहे. असं मुख्यमंत्र्यांनी यामध्ये जाहीर केलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील इमोशनल उत्तर दिलं आहे. शिंदे सध्या त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीमध्ये आहेत. त्यांनी यावेळी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचा दाखला देत उत्तर दिलं आहे. काँग्रेससोबत जायचं नाही, हे बाळासाहेबच बोलले होते. त्यावर मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत. समविचारी पक्षांसोबत राहायचं ही बाळासाहेबांचे हे मुख्य विचार आहेत, अशी भावनिक साद शिंदे यांनी घातली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांशी चर्चा करत असून या चर्चेनंतरच ते मुख्यमंत्र्यांना उत्तर देणार आहेत.
ठाकरे सरकारचा खेळ खल्लास!
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभा उपाध्य़क्ष नरहरी झिरवाळ यांना पत्र लिहलंय. या पत्रामध्ये 34 आमदारांच्या सह्या आहेत. शिवसेनेच्या 55 पैकी 34 आमदारांच्या या पत्रावर सह्या असल्यानं बहुसंख्य आमदार हे शिंदे यांच्यासोबत आहेत, त्यामुळे ठाकरे सरकार आता अल्पमतामध्ये आलं आहे. विधानसभेतील बहुमतदासाठी आवश्यक असलेली 145 आमदारांची मॅजिक फिगर महाविकास आघाडी सरकारकडं नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.
बंडखोरांनी सांगावं, राजीनामा देण्यास तयार, वाचा उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील 10 इमोशनल मुद्दे
शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.