SPECIAL REPORT : गोवा न सोडणारे भाजप महाराष्ट्र हातातून जावू देईल का? राबवणार कर्नाटक पॅटर्न?

गोवा आणि कर्नाटकची सत्ता जे सोडत नाहीत. ते इतकं महत्त्वाचं राज्य हातून घालवतील, ही शक्यता कमी आहे. महायुतीचंच सरकार येणार, असं भाजपचे नेते छातीठोकपणे सांगत आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2019 09:28 PM IST

SPECIAL REPORT : गोवा न सोडणारे भाजप महाराष्ट्र हातातून जावू देईल का? राबवणार कर्नाटक पॅटर्न?

मुंबई, 07 नोव्हेंबर : गेल्या 14 दिवसांपासून सुरू असलेला राज्यातला सत्तासंघर्ष अधिकच चिघळला आहे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवटीची चर्चा सुरू झाली आहे. पण याची शक्यता कितपत आहे आणि भाजप महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची सत्ता सोडेल का?

जुन्या विधानसभेचा कार्यकाळ संपायला अवघा एक दिवस बाकी असला तरी महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षानं मात्र शिखर गाठलंय.निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपनं निकालानंतर तब्बल 15 दिवसांनी राज्यपालांची भेट घेतली पण सत्तास्थापनेचा दावा मात्र केला नाही. त्यामुळे राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेनं सुरू आहे का, याची चर्चा जोरात सुरू झाली.

सत्तेत निम्मा निम्मा वाटा मिळवण्यासाठी ज्यांनी ताणून धरलंय त्या शिवसेनेनं भाजपवर थेट आरोप केला.तर या सत्तानाट्यात कमालीचं महत्त्व प्राप्त झालेल्या विरोधकांनीही राष्ट्रपती राजवटीची भीती व्यक्त केली.

पण खरंच महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवटीची वेळ ओढवलीय का?

राष्ट्रपती राजवटीसारखी परिस्थिती नसल्याचं राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचं मत आहे. मग सत्तास्थापनेचा दावा अजून कुणी करत नसेल तर हा पेचप्रसंग सुटणार कसा?. त्याचं उत्तर मिळेल गोवा आणि कर्नाटकाच्या सत्तानाट्यात...

Loading...

- 2017 मधल्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात काँग्रेस 17 जागा मिळवत सगळ्यात मोठा पक्ष ठरला. पण 13 जागा मिळवलेल्या सत्तेत बाजी मारली.

- 2018 मध्ये झालेल्या कर्नाटक निवडणुकीत 104 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला खरा...पण बहुमताचं संख्याबळ नसतानाही सत्ता स्थापन करण्याची धोका पत्कारून भाजपनं हात पोळून घेतले. जेडीयू आणि काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. पण काही महिनेच...कर्नाटकात घोडेबाजाराला ऊत आला आणि अखेर जेडीयू आणि काँग्रेसची सत्ता उलथवून लावत भाजपनं कर्नाटक काबीज केलं. दिल्लीतल्या सत्तेसाठी उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र खूप महत्त्वाचं राज्य आहे.

गोवा आणि कर्नाटकची सत्ता जे सोडत नाहीत. ते इतकं महत्त्वाचं राज्य हातून घालवतील, ही शक्यता कमी आहे. महायुतीचंच सरकार येणार, असं भाजपचे नेते छातीठोकपणे सांगत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं विरोधी बाकावर बसण्याची भूमिका जाहीर केली आणि उद्धव ठाकरेंनीही युती तोडण्याचं पाप करणार नसल्याचं जाहीर केलं आहे.

सर्वच पक्षांच्या भूमिका एवढ्या स्पष्ट असताना सत्तेचं घोडं अडलंय कुठं...सेना-भाजपमधल्या वाटाघाटींवर आणि शिवसेनेनं केलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर. ही कोंडी फुटणार कशी? भाजप महाराष्ट्रात गोवा आणि कर्नाटक पॅटर्न राबवणार का? की सेनेशी वाटाघाटी करून सत्तेत सहभागी करून घेणार, हाच खरा प्रश्न आहे.

====================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2019 09:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...