— Raj Thackeray (@RajThackeray) June 30, 2022'मी चिकटून बसणारा नाही' "गुळाच्या ढेपेला मुंगळा चिकटून बसतो, तसा मी चिकटून बसणारा नाही. मी गेल्या बुधवारीच वर्षा निवासस्थान सोडून माझ्या मातोश्री निवासस्थानी आलो. मी आज आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्रीपदाचा देखील त्याग करत आहे. आजपर्यंत आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम आणि आशीर्वाद दिला. ठिक आहे, मी घाबरणारा नाही. पण कारण नसताना उद्या जे काही बंदोबस्तात शिवसैनिकांचं रक्त सांडेल त्या पापाचे धनी जे कुणी असतील त्यांना होऊद्या. मी होणार नाही. म्हणून मी शिवसैनिकांना सांगतोय, उद्या अजिबात मध्ये येऊ नका. जे काही व्हायचंय ते होऊद्या. त्यांचा गुलाल त्यांना उधळू द्या", असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिदाच्या राजीनाम्याची घोषणा करताना केले होते. एखादी गोष्ट चांगली असली की त्याला दृष्ट लागते, असं म्हणतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो. आजच्या बैठकीत शिवसेनेचे फक्त चार मंत्री होते. औरंगाबादच्या नामकरणाचा ठराव मांडला तेव्हा दोन्ही पक्षांनी विरोध केला नाही. त्यांचे विशेष आभार मानतो. ज्यांचा विरोध आहे असं भासवलं जात होतं ते सोबत राहिले, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raj Thackeray, Uddhav tahckeray