मुंबई, 30 जून : 'उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार पडल्यानंतर आम्ही जल्लोष केला' या बातम्या खोट्या आहेत. 'उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याचा आम्हाला आनंद नाही, आमची लढाई मंत्रिपदाची नाही,' असे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deeapk Kesrkar) यांनी स्पष्ट केले. आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत, विधिमंडळ पक्ष आमचा आहे. आमच्यात सहभागी न झालेल्या 16 आमदारांना कारवाईचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा केसरकर यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर केसरकर यांनी पहिल्यांदाच पत्रकर परिषद घेतली, त्यामध्ये ते बोलत होते. ठाकरे कुटुंबीयाबद्दल आम्हाला राग नाही, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल पूर्वीसारखेच प्रेम आहे, असे केसरकर यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना सल्ला दिला.
'आमची भूमिका समजून न घेतल्यानं ही वेळ आली आहे. मागील काही दिवसांपासून आमच्यामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न झाला. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेसने पाडले. संजय राऊत यांनी ते जाहीपणे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी याचा जाब विचारायला हवा होता, मात्र त्यांनी तो तसा केला नाही. ' राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना संपवण्याचे प्रयत्न केल्याचं सांगत त्यांनी भाजपासोबतच्या युतीचे जोरदार समर्थन केले.
'... तेव्हा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो','दादू' च्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
संजय राऊत यांना सल्ला
संजय राऊत जेवढं कमी बोलतील तेवढं चांगले आहे. केंद्र सरकारविरूद्ध वक्तव्ये करून त्यांनी राज्य आणि केंद्रात वाद लावला.त्याचा परिणाम विकासावर झाला, असा दावा केसरकर यांनी केला.संजय राऊत यांनी प्रक्षोभक भाषणं करून कार्यकर्ते रस्त्यावर येतील असा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.