Home /News /mumbai /

गुवाहाटी ते विधानभवन कसा होणार बंडखोरांचा प्रवास? वाचा Inside Story

गुवाहाटी ते विधानभवन कसा होणार बंडखोरांचा प्रवास? वाचा Inside Story

महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला सत्तासंघर्ष आता विधानसभेच्या दारावर येऊन धडकणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 29 जून : महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला सत्तासंघर्ष आता विधानसभेच्या दारावर येऊन धडकणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यपालांच्या आदेशानंतर गुरूवारी सकाळी 11 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार आहे. गुरूवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विधानसभेचे कामकाज पूर्ण करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार राहणार की जाणार? हे आता काही तासांमध्ये स्पष्ट होईल. शिंदे समर्थकांचा गोव्यात मुक्काम गुरुवारी बहुमत चाचणी असल्यामुळे शिंदे समर्थक आमदारांचा बुधवारचा मुक्काम गोव्यात असेल. सर्व आमदारांना सुरक्षेच्या कारणास्तव गोव्यामध्ये ठेवले जाणार आहे. गोव्यामध्ये भाजपचे सरकार आहे. त्यामुळे आमदारांना गोव्यात ठेवण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती समोर आली आहे. गोव्यामध्ये आमदारांसाठी हॉटेलही बुक करण्यात आले आहे कोल्हापूरमधील काही जणांचे आधार कार्ड घेऊन हे बुकिंग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. News18 lokmat ला मिळालेल्या माहितीनुसार बंडखोर आमदार आज खासगी विमानाने (Spice Jet) 4.30 वाजताच्या दरम्यान गोव्यात पोहोचणार आहेत. यासाठी गोव्यातील ताजमध्ये 71 रूम्स राखीव करण्यात ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह 51 आमदार हे गोव्यामध्ये 'ताज कन्वेंशन' या हॉटेलमध्ये थांबतील आणि उद्या सकाळी मुंबईला पोहचतील असे सांगण्यात आले आहे. मुंबईत मिळणार सुरक्षा गोव्यात सर्व बंडखोर आमदार गुरूवारी सकाळी मुंबईत येणार आहेत.  गोव्याहून सर्व आमदार विशेष विमानानं मुंबईत दाखल होतील. गुरूवारी सकाळी 11 वाजता विधानसभेचं विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनासाठी सर्व आमदार विमानतळावरून थेट विधिमंडळात दाखल होतील. विधिमंडळाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष सुरक्षा व्यवस्था करण्याचे आदेश राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात दिले आहेत. त्याचबरोबर या आमदारांना भाजपा आणि छावा संघटनेकडून विशेष सुरक्षा मिळणार आहे. अनिल देशमुख, नवाब मलिकांना फ्लोअर टेस्टला मतदानाचा अधिकार मिळणार? शिंदे गटाच्या स्वागताची भाजपाने जोरदार तयारी केली आहे. उद्या होणाऱ्या अधिवेशनासाठी सज्ज रहा अशी सूचना भाजपा कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठींनी दिली आहे. त्याचबरोबर सकाळी विमानतळ परिसरात उपस्थित राहण्याचे आदेश देखील पक्षानं दिले आहेत. भाजपासह छावा संघटनेचे कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरणार आहे. छावा संघटनेचे 2 हजार कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत.  विमानतळ ते विधानभवनपर्यंत ते आमदारांना संरक्षण देणार आहेत.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या