Home /News /mumbai /

शिंदे गटाच्या स्वागतासाठी भाजपाची फिल्डिंग, मुंबईत करणार शक्तिप्रदर्शन

शिंदे गटाच्या स्वागतासाठी भाजपाची फिल्डिंग, मुंबईत करणार शक्तिप्रदर्शन

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात आता भाजपा थेट मैदानात उतरणार आहे. शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट उद्या (गुरूवार) मुंबईत येणार आहे. त्यावेळी त्यांच्या स्वागताची भाजपाने जोरदार तयारी केली आहे.

    मुंबई, 29 जून : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात आता भाजपा थेट मैदानात उतरणार आहे. शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट उद्या (गुरूवार) मुंबईत येणार आहे. त्यावेळी त्यांच्या स्वागताची भाजपाने जोरदार तयारी केली आहे. उद्या होणाऱ्या अधिवेशनासाठी सज्ज रहा अशी सूचना भाजपा कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठींनी दिली आहे. त्याचबरोबर सकाळी विमानतळ परिसरात उपस्थित राहण्याचे आदेश देखील पक्षानं दिले आहेत. भाजपासह छावा संघटनेचे कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरणार आहे. छावा संघटनेचे 2 हजार कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत.  विमानतळ ते विधानभवनपर्यंत ते आमदारांना संरक्षण देणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  (Governor Bhagat Singh Koshyari)  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यपालाच्या या पत्रानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. भारतीय जनता पक्षानं सर्व आमदारांना संध्याकाळपर्यंत मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. उद्या होणाऱ्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनापूर्वी राज्यपालांनी हा आदेश दिला आहे. आसामी पाहुणचाराची शिवसेना आमदारांनी ठेवली जाणीव, गुवाहाटी सोडण्यापूर्वी जिंकलं मन! विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेतली. सरकार अल्पमतात असल्याने निर्णयात हस्तक्षेप करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपालांकडे करण्यात आली होती.राज्यपालांना इमेलद्वारे आणि प्रत्यक्ष भाजपकडून पत्र देण्यात आले. या पत्रात राज्याच्या आताच्या परिस्थितीचा उल्लेख केला आहे. 'शिवसेनेचे 39 आमदार बाहेर आहेत. त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगावं, असं विनंती करणारं पत्र राज्यपालांना देण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लेख केला आहे. यावर राज्यपाल उचित निर्णय घेतील. अशी आम्हाला अपेक्षा आहे,' असे मत भाजपाने व्यक्त केले होते.  भाजपाच्या पत्रानंतर काही तासांमध्ये राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: BJP, Eknath Shinde

    पुढील बातम्या