Home /News /mumbai /

राज्यपालांना डिस्चार्ज मिळताच सत्ताबदलाच्या हलचालींना वेग, फडणवीस करणार दिल्लीची वारी

राज्यपालांना डिस्चार्ज मिळताच सत्ताबदलाच्या हलचालींना वेग, फडणवीस करणार दिल्लीची वारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (governor bhagat singh koshyari) हॉस्पिटलमधून राजभवानात परतताच राजकीय हलचालींंना वेग आला आहे.

    मुंबई, 26 जून : शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Shivsena leader Eknath Shinde)  यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यात वेगानं राजकीय घडामोडी घडत आहेत. त्याचवेळी राज्यपाल भगतसिंह  कोश्यारी (governor bhagat singh koshyari)  यांना कोरोनाची लागण झाल्यानं या हलचालींना मर्यादा आल्या होत्या. राज्यापाल आता करोनातून बरे झाले असून हॉस्पिटलमधून राजभवनावर परतले आहेत. राज्यपाल हॉस्पिटलमधून राजभवनात परतताच भारतीय जनता पक्ष (BJP) सक्रीय झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज (रविवार) पुन्हा एकदा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. फडणवीस गेल्या काही दिवसांमध्ये चौथ्यांदा दिल्लीला जाणार आहेत. या दिल्ली दौऱ्यात ते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर चर्चा करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गट राज्यपालांना भेटणार राज्यपाल राजभवनावर नसल्यामुळे राजकीय घडामोडींचा वेग मंदावला होता. आता राज्यपाल राजभवनावर पोहोचल्यामुळे एकनाथ शिंदे गट सक्रिय होईल आणि लवकरच राज्यपालांना भेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यपाल आता का भूमिका घेतात हे पाहण्याचे ठरणार आहे. आदित्य ठाकरेंनी लावला एकनाथ शिंदेंच्या बंडाला सुरुंग, 16 आमदार संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेनं गटनेतेपदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी केली आहे. पण, शिंदेंनी गटनेतेपद अजूनही सोडलं नाही. आज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे. या जयंतीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून शाहू महाराज यांना अभिवादन केलं आहे. मात्र, शिंदे यांनी शाहू महाराज यांचं ट्वीट केलेल्या पोस्टरमध्ये अजूनही एकनाथ शिंदे हे गटनेते असल्याचा उल्लेख आहे. एवढंच नाहीतर सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री ठाणे आणि गडचिरोली याचाही उल्लेख केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गटनेतेपदासाठी शेवटपर्यंत लढाई करण्याचा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केलाय.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Devendra Fadnavis

    पुढील बातम्या