Home /News /mumbai /

Video: एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणातील 'बाहुबली'? कार्यकर्त्यांकडून लक्षवेधी बॅनरबाजी

Video: एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणातील 'बाहुबली'? कार्यकर्त्यांकडून लक्षवेधी बॅनरबाजी

ठाण्यातील लुईसवाडी मेट्रो ब्रिजच्या खाली हा भला मोठा बॅनर लागलेला पाहायला मिळतोय. एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणातील बाहुबली असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यकर्त्यांचा आहे.

    मुंबई, 29 जून : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक घाव करत शिवसेनेचे (Shivsena) दोन तुकडे केले. त्यानंतर राज्याच्या सत्तासंघर्षात रोज नवीन ट्विस्ट येत आहेत. या संपूर्ण घटनाक्रमात एकनाथ शिंदे मोठे नेते म्हणून समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आम्ही एकनाथ शिंदे सोबत आहोत यासाठी मोठं शक्तीप्रदर्शन त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराबाहेर शिवसेना दक्षिण भारतीय विभागाकडून लक्षवेधी असा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर एकनाथ शिंदे हे बाहुबलीच्या रूपात दिसत आहेत. तर त्यांच्या छातीवर धर्मवीर आनंद दिघे यांचा ‌फोटो आहे तर पाठीमागे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेला हा बॅनर आहे. ठाण्यातील लुईसवाडी मेट्रो ब्रिजच्या खाली हा भला मोठा बॅनर लागलेला पाहायला मिळतोय. एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणातील बाहुबली असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यकर्त्यांचा आहे. सत्तासंघर्षाचा उद्या निकाल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी आज सकाळीच महाविकास आघाडीला पत्र पाठवले आहे. त्यामुळे उद्या गुरुवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. एवढ्या कमी वेळेत तयारी कशी पूर्ण होणार अशी चर्चा रंगली होती. पण, विधानभवनाने तयारी पूर्ण केली आहे. तर भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने आमदारांना हजर राहण्याचे आदेश दिले आहे. तर बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांचा गट गुवाहाटीवरून निघाला आहे. आधी गोव्या मुक्कामी थांबणार आहे. त्यानंतर उद्या मुंबईमध्ये दाखल होणार आहे. त्यावेळी त्यांच्या स्वागताची भाजपाने जोरदार तयारी केली आहे. उद्या होणाऱ्या अधिवेशनासाठी सज्ज रहा अशी सूचना भाजपा कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठींनी दिली आहे. त्याचबरोबर सकाळी विमानतळ परिसरात उपस्थित राहण्याचे आदेश देखील पक्षानं दिले आहेत. भाजपासह छावा संघटनेचे कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरणार आहे. छावा संघटनेचे 2 हजार कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत.  विमानतळ ते विधानभवनपर्यंत ते आमदारांना संरक्षण देणार आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav thacakrey

    पुढील बातम्या